पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रभावी ठरल्याचे दिसून येते. या साहित्याचे कलात्मक मूल्यही अधिक आहे. कलानिर्मितीचे भान स्वातंत्र्योत्तर कालखंडातील साहित्यिकांनी विशेष ठेवले आहे. महाभारताचा सूक्ष्म अभ्यास करून त्यांच्या या काळातील साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत म्हणूनच त्यात सत्त्वही अधिक जाणवते. शिवाय रंजन प्रचार, उद्बोधन या सर्वच प्रेरणांवर मात करण्याचे सामर्थ्य साहित्यकृतीत असते हें 'सौभद्र', 'कीचकवध', 'कौंतेय', 'ययाती', 'मत्स्यगंधा', 'मृत्युंजय', 'राधेय', 'जीवन- 'माता द्रौपदी' व 'एकलव्य' या साहित्यकृतींनी सिद्ध केले व्यास', आहे. या विविध प्रेरणांच्या आधाराने महाभारतावर आधारित निवडक साहित्यकृतींची केलेली वर्गवारी परिशिष्ट 'अ' मध्ये दिली आहे. उपरोक्त विविध प्रेरणांपैकी महाभारताधिष्ठित ललित साहित्यात कलात्मक निर्मितीची प्रेरणा अधिक प्रभावी आहे. त्यातही १९५० नंतरच्या साहित्यात हा प्रभाव विशेष जाणवतो. संस्कृतिदर्शनाची एक महत्त्वाची प्रेरणा येथे नव्याने आढळते. या प्रेरणांच्या सीमारेषा मात्र काहीशा अस्पग्टच आहेत. एकाच साहित्यकृतीतही या विविध प्रेरणा आढळू शकतात. उदाहरणार्थं खाडिलकरांचे ' कीचकवध' या नाटकाचा समावेश कलात्मकनिर्मिती, उद्बोधन, मनोरंजन व प्रचार या प्रेरणा असलेल्या साहित्यातही करता येतो. ७) महाभारताकडे पाहण्याच्या विविध दृष्टिकोनात कृ. प्र. arisonरांचा राजकीय दृष्टिकोन, इरावती कर्वे यांचा समाजशास्त्रीय दृष्टिकोन, दुर्गा भागवतांचा सतत कलेचे भान ठेवणारा कलावादी दृष्टि- कोन, आनंद साधले यांचा व्यवहारवादी दृष्टिकोन, बाळशात्री हरदासांचा संस्कृतिनिष्ठ दृष्टिकोन, अनंतराव आठवले व डॉ रा. शं. वाळिंबे यांचा महाभारतनिष्ठ चिकित्सक दृष्टिकोन, डॉ. प वि वर्तक, शं. के. पेंडसे यांचा बुद्धिवादी वैज्ञानिक दृष्टिकोन, वि. वा. शिरवाडकर, रणजित देसाई, वसंत कानेटकर, के बा. सी. मर्ढेकर, मंगेश पाडगावकर इत्यादींचा कलात्मक नवनिर्मितीचा दृष्टिकोन, कै. वि. स. खांडेकरांचा जीवनवादी .. ९५