पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मांडणी करावी लागली. म्हणून त्यांना नवे रंग भरून राजकीय, सामा- जिक आशयाला साकार करता आले आहे. या पुराणकथेच्या आधाराने नव्या वर्तमानकालाचा वेध घेता आला आहे. ४) महाभारत एक सांस्कृतिक महाकाव्य किंवा पुराणकथा म्हणून साहित्यिक आणि रसिक अशा सर्वांच्याच मनात रुजलेले आहे. सर्वांना स्थूलमानाने ज्ञात असलेल्या या कथेचेच आवाहन आणि कुतूहल मराठी साहित्यिकांना आहे. त्यांनी ते सतत जागृत ठेवण्याचा प्रयत्न आपल्या साहित्यातून केला आहे. ५) मराठी साहित्यिकांनी ही महाभारताची कथा विविध साहित्य प्रकारातून व्यक्त केली आहे. ययाती उपाख्यानावर 'ययाती' कादंबरी आणि नाटके, संगीतकाही लिहिल्या आहेत. कर्णावर कौंतेय. मृत्युंजय, राधेय, सूर्यपुत्र, अशी नाटक, कादंबरी, आणि चरित्र या वाङमय प्रकारातील निर्मिती आढळते. पण महाभारतावर आधारित नाटकांची संख्या कादंबरी - काव्य या प्रकारापेक्षा अधिक आहे. याचे कारण महा- भारतात नाट्यानुकूलता व संघर्षमयता अधिक आहे, हे सांगता येईल. आधुनिक हिन्दी कवींच्या प्रमाणे मराठी कवींनी महाभारताचे काव्य निर्मितीसाठी चितन केलेले दिसत नाही म्हणून काव्यनिर्मिती विरल- त्वाने आढळते. ६) कालखंडाचा विचार केला तर अब्वल इंग्रजी कालखंडात महाभारताचे मराठीकरण करण्याची प्रवृत्ती विशेष प्रभावी आहे. शृंगार, करुण अद्भुत, भयानक, बीभत्स इत्यादी रसांची निर्मिती करण्याकडे या साहित्यिकांची प्रवृत्ती दिसून येते. कलात्मक निर्मिती या कालखंडात फारशी आढळत नाही. यानंतरच्या म्हणजे १८७५ ते १९४७ या स्वातंत्र्यपूर्व कालखंडात मनोरंजन, उद्बोधन आणि प्रचार ह्या प्रेरणा आढळतात. समाजाची स्वातंत्र्याला अनुकूल अशी मनोभूमी तयार होण्यासाठी महाभारताचा आधार साहित्यिकांनी घेतला आहे. स्वातं- त्र्योत्तर कालखंडात म्हणजे १९५० ते १९७५ या काळात महाभारताच्या चिंतनातून संस्कृतिदर्शनाची प्रेरणा व कलात्मक निर्मितीची प्रेरणा ९४...