पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/4

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.मराठी शब्दांचें उद्घाटन.

चमत्कारिक ऐतिहासिक माहिती, मनोविकारांच्या नैसर्गिक व्यापारांची प्रतिबिंबे वगैरे अनेक गोष्टी प्रादुर्भूत होतात. शब्दांच्या अभ्यासापासून मोठा लाभ आहे. जें ज्ञान प्राप्त होण्यास अनेक ग्रंथांचें परिशीलन करावयास पाहिजे तें ज्ञान कधीं कधीं एकएकट्या शब्दांत दृष्टोत्पत्तीस येतें. एखाद्या अजबखान्याचें दार आपल्या डोळ्यांपुढें एकदम उघडलें असतां ज्याप्रमाणें हरएक प्रकारच्या चीजा दृग्गोचर होऊन आपणांस सानंदाश्चर्य वाटतें, त्याप्रमाणें शब्दमय अजबखान्याचें कवाड कुशळ भाषावेत्त्यानें उघडलें असतां अननुभूत अशा आनंदाश्चर्यादि भावनांच्या लाटांनीं आपलें अंत:करण जणूं काय उचंबळूं लागतें. अजबखान्यांत ठेवलेल्या प्रत्येक चीजेंत कांहींना कांहींतरी विशेष असतोच, कीं ज्या विशेषामुळें ती चीज आपल्या निरीक्षणाचा विषय होण्यास योग्य होते. कांहीं चीजा एकाद्या देशाचें किंवा एकाद्या प्रसिद्ध पुरुषाचें किंवा एखाद्या कुशळ कारागिराचें स्मरण करून देतात ; कांहीं चीजा कारागिराच्या अपूर्व कसबाची किंवा दीर्घ प्रयत्नाची साक्ष देतात; कांहीं चीजा देशविशेषांची उन्नति दाखवितात; कांहीं चीजा इतिहासांतील लक्ष्यांत धरण्यास योग्य किंवा चमत्कारिक अशा प्रस्तावांनीं अंतःकरणास प्रसन्न करतात. भाषा हा एक प्रकारचा अजबखानाच आहे. त्यांतील पाहावयाच्या चीजा म्हणजे शब्द. ह्या शब्दांचें जर आपण योग्य दिशेनें व लक्ष्यपूर्वक मनन केलें तर आपणांस असें आढळेल कीं प्रत्येक शब्दामध्यें कांहीं तरी विशेष असतोच, व त्या विशेषामुळें तो शब्द अल्प प्रमाणानें तरी आपल्या ज्ञानवृद्धीचें एक साधन होऊन जातो. अजबखान्यांत ठेविलेल्या चीजा, चर्मचक्षुस प्रसन्न करितात, त्याप्रमाणें भाषाभांडारांतील शब्दरूपी चीजा आपल्या मनश्चक्षूूस प्रसन्न करितात. पुढील निबंधांत