पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/3

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.




मराठी शब्दांचें उद्घाटन
----------
उपोद्घात.
निधानगर्भामिव सागराम्बरां
शमीमिवाभ्यन्तरलीनपावकाम् ।
नदीमिवान्तःसलिलां स्वरस्वतीं
नृपः ससत्वां महिषममन्यत ॥
     कालिदास, रघुवंश, सर्ग ३ श्लोक ९.
निधान उदरीं जिच्या धरणि ती विराजे जशी ॥
जिच्या जठरिं अग्नि ती विलसते शमी कां जशी ॥
जलौघ उदरीं जिच्या असि सरस्वती शोभती ॥
नृपाशिं गमली तशी तंव निजा सगर्भा सती ॥
     गणेशशास्त्री लेले.

“जगास जसजशी उन्नतावस्था प्राप्त होत गेली तसतसे त्यास क्रमाक्रमानें हरएक वस्तूसंबंधाने ज्ञान व अनुभव हीं आजपर्यंत मिळत आली आहेत व तीं मुख्यत्वेंकरून ग्रंथांमध्यें सांठविलीं गेलीं आहेत; तसेंच ह्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ ग्रंथांच्याच द्वारानें मागच्या पिढीपासून पुढच्या पिढीस प्राप्त होत गेला," हा सिद्धांत कबूल न करणारे लोक प्रायः आढळावयाचे नाहींत. परंतु पुढील निबंधांत आम्ही कांहीं वेगळाच सिद्धांत वाचकांस सादर करून तो अनेक प्रमाणांनीं समर्थिणार आहों. तो सिद्धांत हा कीं, जगाचें ज्ञान व अनुभव हीं ग्रंथांतच केवळ संचित झालेलीं असतात असें नव्हे, तर एकेकट्या शब्दांतसुद्धां हरएक प्रकारचें अमूल्य ज्ञान, अपूर्व अनुभव,