( ४६ ) घेण्याची मुभा राहील. दुसरी गोष्ट अशीं कीं सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासाचा बोजा सारखा पडत नाहीं हा आक्षेप या सूचनेवर आणतां येत नाहीं. ज्यांना मातृभाषा नाहीं व जे ती शिकण्याची पर्वा करीत नाहींत त्यांनां प्राचीन संस्कृतादि अथवा अर्वाचीन फ्रेंच व पर्शियन वगैरे भाषा त्यांच्या मजींप्रमाणें घेतां येतीलच. तिसरी गोष्ट अशीं कीं ही सूचना पसंत पडल्यास, ख-या विद्वतेची कसोटी लागून देशी भाषेतील उच्च प्रताच्या वाङ्मयास उतेजन मिळेल. पुरातन संस्कृतादि भाषांच्या अध्य्यनाच्या आड ही सूचना यावयाची नाही; कारण बी. ए. च्या परीक्षेत त्या भाषा आवश्यक विषयांत घातलेल्या आहेत, ही चौथी गोष्ट होय. यावरून सहज असें दसून येईल कीं आमच्या सूचना पूर्वी घेतलेल्या आक्षेपांस पात्र नसून त्यांच्यांत कांहीं विशिष्ट फायदाही आहे. या गोष्टींमुळे ती सिंडिकेट व सेनेट यांस पसंत पडेल असें आह्मांस वाटतें. (४) यावर कांहींचें हाणणें असें पडेल कीं विद्यार्थ्यांना विषयांची परीती करण्याची जी ही मुभा दिली आहे तिचा पुष्कळ विद्यार्थी फायदा घेणार नाहीत व एकंदरींत ही सूचना परीणामीं मेोठीशी हिंत होईल असें नाहीं. परंतु, या आक्षपास आमचें उत्तर असें आई का अशी भाति बाळगण्याचें मुळीच कारण नाही. आणखी आपल्या मातृभाषेतील उच्च वाङ्मयाचें अध्ययन करणारे जरी थोडेसे ন্বিত্মাৰ্থ निघाले तरी ते उत्तम प्रतीचे विद्वान् होऊन त्यांचा पुढें त्यांत्र्य मातृभाषेच्या अभिवृद्धीच्या कामीं जो उपयोग होईल तो शब्दां सांगता येण्यासारखा नाही, व ते अशा रीतीनें आपल्या युनिव्हर्सि: टाला ललामभूत होतील. आणखी असें आहे की केल्यानें युनिव्हर्सिटीनें आपलें कर्तव्य तरी बजावल्यासारखे होईल, व इष्ट हेतून साधल्यास त्याचा दोष सर्वस्वी लोकांकडेच राही” हछीं कोणत्याही कॅलेजांत या देशी भाषांतील उच्च वाङमय शिकविण्याची सोय नाहीं हा आक्षप आणण्याचें कारण दिसत नाहीं. कार" आमची सूचना पसंत झाली तरच ही उणीव भासणार आहे; आणि र्ह उणीव योग्य वेळांत कांहीं विशिष्ट देणग्यांनीं व इतर उपायांनीं सहज भरून निघेल. आणखी हा आक्षप युनिव्हर्सिटीनें इतर भाषf पसंत केल्या आहेत त्यांनांही बरोबरीनेंच लागू पडतो.
पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/51
Appearance