पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ?', ) वेधलें असून त्यांच्याच सूचनेवरून कांहीं वर्षांपूर्वी मुंबई सरकारानें हा प्रश्न युनिव्हर्सिटीपुढे विचार करण्याकरितां ठेविला होता ही गोष्ट आपणांस विदित आहेच. ही गोष्ट अमलांत आणण्याकरितां निरनिराळ्या सूचना पुढे आल्या. व सरतेशेवटीं सिंडिकटनें शिफारस करून या सूचनेचें असें रूपांतर केलें कीं, * आर्टस कोर्सच्या प्रत्येक उच्च परीक्षेस विद्याथ्र्यांनां स्वभाषेत निबंध लेखन व भाषांतर हे विषय अवश्य असावेत.” परंतु सेनेटमध्यें ३४ विरुद्ध ४२ मतें पडून ही सूचना थोड्याशा बहुमतानें नापसंत ठरली. सेनेटमध्यें झालेल्या वादविवादावरून असें समजतें कीं ही सूचना अमान्य होण्याचें पाहलें कारण हें की तिच्या योगानें अगोदरच जड असलेलें अभ्यासाचें ओझे अधिक जड होईल. दुसरें कारण असें कीं या इलाख्यांत प्रचलित असलेल्या देशी भाषांपैकीं कोणतीच भाषा ज्यांची जन्मभाषा नाहीं अशा विद्याथ्र्यावर या सूचनेनें विनाकारण जास्त बोजा पडेल. व निबंधलेखन व भाषांतर यांस फारशी विद्वत्ता लागत नसून त्यांच्या योगानें देशी भाषांतील उच्च वाङ्मयास उतेजन मिळेल असेंही नाहीं. (२). आपणांपुढें जो प्रश्न मांडिला आह त्याबद्दल या युनिव्हर्सिटीच्या पुष्कळ फेलोमंडळीस कळकळ वाटत आहे. ह्मणून वर नमूद केलेला आक्षेप टाळून युनिव्हर्सिटीच्या उच्च परीक्षांत देशी वाङ्मयाच्या अध्ययनास उतेजन कसें देता येईल या प्रश्नाचा विचार पुन्हा करण्यास योग्य काल आतां प्राप्त झाला आहे असें आम्हांस वाटतें. सिंडिकेटच्यापुढे आम्ही सूचना जी मांडितों आहों ती येणेंप्रमाणें आहे:- (१) जे विद्यार्थी बी. ए. च्या परिक्षेस भाषा हा ऐच्छिक विषय घेतात त्यांस संस्कृतदि इतर दुस-या भाषांएवजी मराठी, गुजराथी, कानडी व हिंदुस्तानी यांपैकी कोणतहिा भाषा घेण्याची मुभा असावी. या सूचनेच्या योगानें पान (यु. का व. १८९६ ) ४६ पा. २ नियम ३१ या मध्यें दिलेल्या भाषांच्या यादींत या देशी भाषा नमूद करण्यापलीकडे कसलाही फेरफार करण्याची जरूर पडणार नाह[. (२) त्याचप्रमाणें पान ६४ पा. २ नियम ५७ मध्यें फेरफार करून एम. ए. च्या परीक्षेस ऐच्छिक दुस-या भाषांऐवजी देशी भाषा घेण्याची मुभा विद्याथ्र्यास मिळावी. (३) या वैकल्पिक सूचनेच्या योगानें सांप्रत नेमलेल्या अभ्यासांत अधिक भर न पडून विद्याथ्र्यास वाटेल ती भाषा दुसरी भाषा या नात्यानें