Jump to content

पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( 33 ) नाकारिलें. त्यानंतर बा. ए. व एम. ए. परिक्षांत ज्या ऐच्छिक दुस-या भाषा आहेत त्यांबरोबरच देशी भाषाही घालाव्या ह्मणून एक नवीन सूचना युनिव्हर्सिटीपुढे आली व तिला सुमारें ५४ फेलोंचें अनुमोदनही मिळालें. ह्याप्रकरणासंबंधीं व्हाईस च्यान्सेलरांस पाठविलेलें पत्र भाषांतररूपानें या टिपणाच्या पुरवणींत दिलें आहे. या पत्राचें अवलोकन केलें असतां, पूर्वीचे वादग्रस्त मुद्दे अजिबात गाळले आहेत, असें दिसून येईल. अभ्यासक्रमांत फेरफार करण्यासाठीं ज्या सूचना केल्या आहेत त्यांत इंग्रजी व संस्कृतादि जुन्या भाषा पूर्ववत कायम ठेविल्या असून कोणाच्या डोक्यावर जुलमानें ओझेंही लादलेलें नाही, तर त्याच्या योगानें सर्वाचें स्वातंत्र्य सारखें कायम राहिलें असून कांहीं प्राज्युएटांचें इंग्रजी व संस्कृतादि भाषांकडे कोणत्याहि प्रकारें दुर्लक्ष न होतां त्यांचें मन देशीभाषेतील वाङमयाच्या अध्ययानाकडे लागेल अशी त्यांत योजना केली होती. युनिव्हर्सिटीच्या फेलोंना ह्या प्रश्नाची पूर्ण माहिती मिळावी व त्याचा त्यांस योग्य निर्णय करितां यावा या हेतूनें कै. न्या. रानडे यांन, पु* पुरवणीत दिलेलें पत्र लिहिलेलें होतें. असें झाल्यामुळे ज्याकेोणास, 'मराठी भावहि त्यावेळीं इतर दुस-या भाषांबरोबर ऐच्छिक भाषा ठेवण्याच्या लायखीची होती कीं नाहीं " या प्रक्षाचा विचार असद्ग्रहग्रस्त न होतां सरळ मनानें करावयाचा हेोता, त्यांस तसें करण्यास चांगलें साधन झालें; व त्यावरून त्या प्रक्षाचा निकाल लावण्याची योग्य वेळ आल्यावर फेलेीमंडळी त्या प्रश्नाच्या योग्यायोग्यतेकडे लक्ष देऊन निकाल देतील अशी आशा रावबहादुरांस वाटत r

हाता.

पुरवणी. दि. आनरेवल ई. टी. क्यांडी. व्हाईसच्यान्सेलर मुंबई युनिव्हर्सिटा यांचे हुजुरांस. खाली सह्या करणार यांजकडून नम्रतापूर्वक अर्ज करण्यांत येतो ऐसाज’ युनिव्हर्सिटाच्या उच्च परीक्षांत देशी भाषांच्या व वाड्याच्या अध्ययनास उतेजन मिळावें ह्मणून आह्मी जी सूचना आपल्यापुढें मांडितों आहों तिचा सिंडिकेटकडून व अखेरीस सेनेटकडून योग्य विचार व्हावा अशी आमची नम्र विनंति आहे. या प्रश्नाकडे सेक्रेटरी अॅीफ स्टेट फॅर इंडिया यांचें लक्ष