Jump to content

पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ૪ e ) रिपोर्टाच्या पूर्वीच्या ३२ वर्षांत झालेल्या मराठी वाङमयाच्या आभिवृद्धीचें पर्यालोचन येथें पूर्ण झालें. या विवेचनावरून ज्या गोष्टी निष्पन्न होतात त्यांचा सारांश येणें प्रमाणें आहे:- (१) ज्या वेळीं युनिव्हर्सिटीनें आर्टस कोर्समधील वरच्या परिक्षांच्या अभ्यासक्रमांत देशी भाषांऐवजीं संस्कृतादि अभियुक्त व पुरातन (classics) भाषा घातल्या त्या वेळीं नांव घेण्यासारखे असे फारच थोडे गद्य ग्रंथ होते; व त्यांची एकंदर संख्याही फार थोडी होती, पद्यग्रंथ उत्तम प्रतीचे असून पुष्कळही होते; त्यावेळीं वरील फेरफार घडवून आणण्याचा पक्ष ज्यांनीं उचलला होता त्यांनीं मराठी कविता हा जुन्या उत्कृष्ट संस्कृत कवितेची केवळ छाया अथवा प्रतिध्वनि आहे असें मानण्यांत चुकी केली, पण मराठी गद्य ग्रंथांची उणीव हें कारण मात्र तो फेरफार करण्यास अगदीं सयुक्तिक होतें असें ह्मणावें लागत. (2) परंतु १८६४-१८९४ च्या मधील गेलेल्या तीस वर्षांत ही वस्तुस्थिति बरीच पालटली सन १८६४ पर्यंत छापून निघालेल्या सर्व गद्यपद्यग्रंथांची संख्या,-शालेोपयोगी पुस्तकें खेरीज करून,-पाचशेंपासून सहारों पर्यत होती. परंतु पत्रकें, मासिकें, व संकीर्ण पुस्तकें खेरीज करून हाचसंख्या १८९४ पर्यंत ८००० पर्यंत गेली; व यांपैकी ७००० ग्रंथ वरील तास वर्षांत प्रसिद्ध झालेले आहेत. या ३० वर्षांपूर्वी ग्रंथसंख्येचें जें मान होतें तें १८९४ मध्यें १५ पटीनें वाढले हैं ह्यावरून दिसून येईल. (३) ही ग्रंथसंख्याच केवळ अंवांढव्य प्रमाणानें वाढली आहे असें नाहीं, तर पद्याचें गद्यवाङमयाशी, त्याचप्रमाणें स्वतंत्र ग्रंथांचें पुनरावृत्त व भाषांतरात्मक ग्रंथाशीं, व शालोपयोगी पुस्तकांचे सामान्य वाङमयाच्या ग्रंथांशी, प्रमाण इतकें वाढलें आहे कीं, लोकांमध्यें वाङमयाचा कळकळ किती वाढली आहे ह्याची खात्रीलायक साक्ष त्यावरून पटते. : ' (४) पुरातन गद्यपद्यग्रंथांचा जीर्णोद्धार यासंबंधानें बिनधास्त इतकें ह्मणण्यास हरकत नाहीं कीं जाँ १२०० पुस्तकें या सदराखालीं येतात