पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४ १ ) त्यांत जुन्याकवितेंत व ऐतिहासिक बखरींत जेवढा अत्यंत महत्वाचा म्हणून भाग आहे तेवढा आला आहे. (५) भाषांतररूपानें झालेल्या ग्रंथाची संख्या सुमारें १००० आहे. त्यांत उत्कृष्ट संस्कृत व इंग्रजी ग्रंथांचें साहाय्य जरी बहुधा सारखेच झालें आहे तरी त्यांतल्यालयांत संस्कृतांचें कांकणभर जास्त झालें आहे असें म्हणण्यास हरकत नाही. एकावसाहून अधिक अशा पहिल्या प्रतीच्या इंग्रजी ग्रंथाची व संस्कृतांतल्या बहुतेक सर्व उत्तम नाटककादंब-यांच्या भाषांतरांची भर पडून मराठी भाषेची अभिवृद्ध फार चांगली झाली आहे. (६) चरित्र, इतिहास, राजनीति, कायदा, वैद्यक, आर्णि भौतिकशाख्ने ह्या विषयांचीं सदरें १८६४ सालपर्यंत अगदी कोरीं होती; परंतु पुढील ३० वर्षात त्या सदराखालीं ब-याच योग्य ग्रंथाचा समावेश झाला आहे. नाटकें, कादंब-या व निबंध या विषयांत झालेली प्रगति तर ह्याहूनही आधक समाधानकारक आहे. (७) मराठी वाङमयाच्या त्यावेळच्या स्थितीवरून त्यांत गद्यपद्य ग्रंथाचा भरणा पुष्कळ झाला होता असें ह्मणण्यास कोठलीही हरकत दिसत नाही; वहीं पुस्तकें तज्ज्ञ लोकांच्या मतें युनिव्हार्सटीनें नेमिलल्या जरी कांहीं इंग्रजी पुस्तकांच्या तोडीची नसली, तरी दुस-या भाषांच्या अभ्यासक्रमांत नेमिलेल्या पुस्तकांच्या तोडीचीं तीं अगदीं निःसंशय आहेत. (८) मराठी वाड्याची जी ही विलक्षण वाढ झाली आहे तांत कांहीं दोषही आहेत. पहिला दोष ह्मटला ह्मणजे त्याची वाढ सर्व दिशेनें सारखी झालेली नाही; व योग्य मार्गदर्शक नसल्यामुळे त्या वाढीत व्यवस्थितपणाही मुळीच दिसून येत नाहीं. (९) शास्त्रीय ग्रंथांचीं अथवा शेक्सपीयरच्या नाटकांची भाषांतरें अथवा रूपांतरें करण्याच्या बाबतींशिवाय युनिव्हर्सिटीच ग्राजुएटांनीं-बोटावर मोजण्याइतकों कांहीं अपवादात्मक उदाहरणें एकीकड़ ठेविलीं तर-कांहीं एक न करण्यांतच प्रसिद्धि मिळविली आहे, ही दुसरी निराशेची गोष्ट होय. तेव्हां मराठी भाषेच्या अभिवृद्धथे झटल्याचें