पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३६ ) देतां येत नाहीं, असें वाटण्याचा संभव आहे; तथापि या आक्षेपाचें निरसन करण्यासाठीं रा. ब. रानडे यांनीं कांहीं प्रसिद्ध पदवीधर व विनपदवीधर ग्रंथकार व मर्मज्ञ यांजकडून उत्कृष्ट १०० मराठी पुस्तकांच्या यादी मागविल्या; व निवडलेलीं पुस्तकें युनिव्हर्सिटीनें इंग्रजी अथवा दुस-या भाषांच्या अभ्यासक्रमांत नेमलेल्या पुस्तकांच्या तोलाची होतां होईतों असावीं अशी त्यांस सूचना केली हेोती. त्यांच्या विनंतीप्रमाणें खालीं नमूद केलेल्या गृहस्थांकडून नऊ. यादी आल्या:- (१) रावबहादूर. के. एम. मराठे एम. ए. एलएल. वा. अनेक शास्त्रीय (५) रा. सा. गो. वा. कानिटकर. बी. ए एलएल. बी. म्याक्समूलर व्याख्यानमाला व भिछच्या ग्रंथांचें भाषांतरकार आणि उत्तम कवि. (३) प्रो. चिं. गं. भानु, बी. ए. स्पेन्सरचे भाषांतरकार व इतरग्रंथकर्त. (४) प्रो. विजापुरकर एम. ए. राजाराम कॉलेज येथील संस्कृत अध्यापक. व एका वाङमयविषयक मासिकाचे संपादक. (५) रा. ग. ज. आगाशे बी. ए. धुळे हायस्कूलचे हेडमास्तर, अर्थशास्त्रावरील एका ग्रंथाचे कर्ते व मार्मिक टीकाकार. हे पांच पदवीधर आहेत. दुसरे चार येणें प्रमाणें आहेत:- (१) रा. वि. को. ओक. डेप्युटा एज्युकेशनल इन्स्पेकटर आणि प्रसिद्ध अंथकार. - (२) रा. राजारामशास्त्री भागवत, मराठा हायस्कुलचे. प्रिन्सिपाल, पुष्कळ. ऐतिहासिक ग्रंथाचे कर्ते व उत्तम संस्कृतज्ञ. (३) वासुदेव शास्त्री खरे, ' नाना फडणवीस 'व' यशवंत महाकाव्य 'यांचे, कर्ते असून एका ऐतिहासिक मासिकच संपादक. ( ४ ) रा. खरे आणि ह. कृ. दामले, पहिले मराठी व्याकरणकार, गलिव्हर्स • ट्राव्हल्सचे भाषांतरकार व इतर ग्रंथ लिहिणारे. या गृहस्थांनीं आपल्या मित्र मंडळीचें मत घेऊन आपल्या यादी कायम केल्या आहेत कै. कृष्णाजी परशुराम गाडगीळ यांनीं आपल्या 'संसारसुख' या पुस्तकांत अगेदरच अशी एक याद दिलेली आहे. या निरनिराळया दहा यादी रा. ब.