पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( &৩ ) रानडे यांनीं फार काळजीपूर्वक तपासून एकमेकांशीं ताडून पाहिल्या. व ह्य दहा गृहस्थांचीं प्रत्येक पुस्तकासंबंधानें मतेंही घेऊन ठेविलीं आहेत. त्यावरून असें दिसून येतें कीं ३० जुने व १० नवे मिळून ४० पद्यग्रंथ, ३० चरित्रात्मक ग्रंथ, ३० इतिहास व बखरी, ३० कादंब-या, ३० नाटकें, २५ निबंध, व सुमारे १२ शास्त्रीयविषयक मिळून २०० पुस्तकांस वर सांगितलेल्या गृहस्थांपैकीं दोन अथवा अधिक गृहस्थांची पसंती मिळून उत्कृष्ट अशी ठरतात. तीन अथवा अधिक गृहस्थांची पसंती पाहिली असतां ही संख्या १५० होते; आणि पांच अथवा सहा जणांच्या पसतीस उतरणारीं अशी २० पद्य व ४० गद्य मिळून ६० पुस्तकें आढळतात. भाग ५ वा ( सारांश) पांच अथवा आधक अशा विद्वान् ग्रंथकारांनीं पसंत केलेल्या ज्या ६० पुस्तकांचा मागील भागांत उल्लेख केला आहे तीं येणेंप्रमाणें:- कविता. १ नलोपाख्यान. रघुनाथपंडित २ रामविजय. । श्रीधर. ३ हरिविजय. על ४ महाभारत. मुक्तेश्वर, ५ केकावली. मोरोपंत. s महाभारत. ኃዖ ७ यथार्थदीपिका. वामनाः. ८ ज्ञानेश्वरी. ज्ञानदेव. ९ भागवत. एकनाथ. . १० अमृतानुभव. ज्ञानदेव. रामजोशी. १२ दासबोध. रामदास. १३ मनाच *लाक. y १४ अभंगाची गाथा. तुकाराम, १५. राजाशिवाजी. कुंटे. १६ पोंवाडे. शाळिग्राम (प्रकाशक.) १७ गंगावर्णन. चिंतामणी पेठकर.