पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३५ ) वर्तमानपत्रे आहेत. रिपोर्टाच्या पूर्वीच्या तीस वर्षात चालू असलेल्या स्थितीशीं तुलना करितां असें दिसून येईल की, या देशांत वर्तमानपत्रांचा जशी प्रगति झाली आहे तशी स्पष्टपणें दिसून येणारी प्रगति कोणत्याही वाङ्मयात्मक चळ‘वळींत झालेली नाही. या ठिकाणीं वर्तमानपत्रांचा विचार फक्त वाङ्मयाच्याच दृष्टीनें करावयाचा आहे आणि त्या बाबतींत झालेली प्रगति चांगली उत्साहजनक आहे. सुमारें १६ उत्तम वर्तमानपत्रांच्या वगैणीदरांची संख्या हजारांवर आहे; परंतु तीस वर्षांपूर्वी १०० वर्गणीदार सुद्धां मिळण्यास मोठी मारामार पडे. कांहीं वर्तमानपत्रकर्त्यांच्या पदरीं फार बुद्धिवान् माणसें आहेत व कांहीं संपादकांस आपल्या श्रमाचा चांगलाच मोबदला मिळतो. तथापि, छापखान्यांतील लोकांस पुरेसें काम मिळत नाहीं सबब त्यांस तें मिळावें, ह्मण्णूनञ्च वर्तमानपत्र काढण्याचें धाडस केल्याचीं उदाहरणें पुणें मुंबई शिवाय इतर ठिकाणच्या वर्तमानपत्रांत पुष्कळ आढळून येतात; व अशा पत्रांचे नामधारी संपादक बेताबाताचेच शिकलेले असून त्यांस पगारही अगदी थोडाच मिळतो, ही गोष्ट • सांगितल्या खेरीज रहावत नाहीं. हें पर्यालोचन पुरें करण्यापूर्वी कांहीं खीग्रंथकारांचा थोडासा उछेख करणें जरूर आहे. पंडितारमाबाई ह्या त्यांमध्यें अग्रणी होत. आनंदाबाई जोशी यांचे चरित्र लिहिणा-या सौ. काशीबाई कानिटकर ह्या त्यांच्या खालोखाल স্বানান, पुष्पकरंडक पुस्तककत्रीं मिस भोर, सौ. सावरकर, गोदावरीबाई पंडित, काशीबाई, पार्वतीबाई आणि रुक्मिणीबाई यांचाही नामनिर्देश करण्या'सारखा आहे. एका स्त्रीनें तर * अार्यभगिनी ? हें पत्र पुष्कळ वर्षे चालविल्याचें يخ आढळत. ह्या पर्यालोचनावरून मराठी वाड्याच्या एकंदर व्याप्तीची व भिन्न भिन्न शाखांची साधारणपणें पूर्ण कल्पना होते खरी, परंतु ह्या पूर्वीच्या tir ’वर्षात प्रसिद्ध झालेले जुने गद्यपद्य ग्रंथ, भाषांतरें, आणि स्वतंत्र ગ્રંથ, ‘काय दर्जाचे:व किती योग्यतेचे आहेत हा पुढचा प्रश्न अद्यापि तसाच राहिला, असें कोणी प्रतिपादन करील, तर ही गोष्ट खरी आहे. परंतु ह्या પ્રશ્નવેિ જીત્તર निरनिराळ्या सदरवारींतील ग्रंथाचें विवेचन करितांना येऊन गेलेंच आहे. या विषयाचा विशेष परिचय नसलेल्या माणसांस रा. ब. रानडे यांनीं वर दिलेलें मत कदाचित एका विशिष्ट व्यक्तीचें आहे, अतएव त्यास fቸቅግ ዛas