पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४ ) यांची 'अबलोन्नति लेखमाला ? रा. नाना पावगी यांचें भारतीय साम्राज्य, कै. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची निबंधमाला, आणि कविपंचक, बर्वे यांची ठगाची जबानी, पंडिता रमाबाई यांची स्त्रीधर्मनीति, वागळे यांचे बेकनचे निबंध, राजाराम शास्त्री भागवत यांचे मरठयांविषयीं चार उद्वार व महाराष्ट्रधर्म, उदास यांचें धौममहाबळेश्वरवर्णन, गाडगीळ यांचें संसारसुख, बाळासाहेब देव यांचें सिसरोचें भाषांतर, आणि रेव्ह. बाबा पदमनंजींचें साहित्य शतक व यमुनापर्यटन, हीं व अशीं आणखीं कांहीं पुस्तकें गद्यांत सामान्य वाचकांस वाचण्यासारखीं आहेत. आतां धर्म व प्रवास या सदराखालच्या पुस्तकांचाच विचार करणें राहिलें आहे. वर सांगितलेल्या तीन पुस्तकांखेरीज हें सदर अगदीं करें पडलें असून त्यांत प्रस्तुत रिपोर्टाच्या पूर्वीच्या तीस वर्षात कांहीं एक भर पडलेली नाही. काशी, रामेश्वर, गोकर्णमहाबळेश्वर इ. यात्रांच्या वर्णनांची दुसरी पुस्तकें या सदराखालीं येतात. परंतु वाङ्मयदृष्टया त्यांचें महत्व कांहीं नाही. धर्म या विषयावरील पुस्तकांसंबंधानें कांहीं सांगण्याचें कारण दिसत नाहीं. त्यांची संख्या खरोखर मोठा आहे खरी, पण तीं आळवावरच्या पाण्याघ्रमाणें क्षणिक, वाड्मयदृष्टया कुचकिंमतीचीं व वेडगळ धर्मसमजुतींनीं भरलेली अशी आहेत. संकीर्ण विषयांवरील पुष्तकांची संख्या सर्व पुस्तकांच्या एक चतुर्थाश आहे व त्यांविषयीं विशेष सांगण्यासारखे कांहीं नाहीं. त्यांत ब-याचशा शालोपयोगी पुस्तकांचा समावेश झाला आहे. मासिकें व वर्तमानपत्रे यांविषयीं दोन शव्द सांगणें जरूर आहे. लोकाश्रय संपादण्यास प्रयत्न करणा-या मासिकांची सर्व संख्या सध्यां १५ आहे. विविधज्ञानविस्तार, ग्रंथमाला, भाषांतर, भारतवर्ष, ऐतिहासिक लेखसाह, केरळकोकिळ आणि बालबोध, ही मासिकें अत्यंत प्रसिद्ध असून फारच उत्कृष्ट रीतानें चालविलीं जात होतीं. ग्रंथमाला, भारतवर्ष ऐतिहासिक लेखर्सग्रह व भाषांतर यांचे संपादक अनुक्रमें,प्रो. विजापूरकर, रा. आपटे आणि पारसनीस, वासुदेव शास्त्री खरे, व राजवाडे हे होत. तरुण ग्रंथकारांस उतेजन दण्याच्या कामों हीं मासेकें फार उपयेागाचीं होतीं खरी परंतु त्यांचा खप फरिच थोडा होता. वर्तमानपत्रांसंबंधानें विचार करितां त्यांची संख्या फारच मोठी ह्मणजे सुमारे १०० असून त्यांत ३ दैनिक आहेत. बाकाची साप्ताहिक आहेत. प्रत्येक जिल्ह्या शहरांत व कांहीं ठिकाणीं प्रत्येक तालुका शहरांत एक अथवा अधिक