पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३३ ) पदवीधरांचीच नांवें कायतीं दिसून येतात. परंतु आमचे उत्तम कादंबरीकार युनिव्हर्सिटी शिक्षण न मिळालेल्या अगर तें पूर्ण न झालेल्याच वर्गातले आहेत. रा. हरी नारायण आपटे व नागेशराव वापट हे आमच्यांतील अत्यंत लोकप्रीय आणि अतिशय नामांकित कादंबरीकार होत. रा. हाळवे, रिजवूड, योगी, कानिटकर वगैरे लेखक आपापल्या परीनें श्रेष्टच आहेत. पदवीधर लोकांस योग्य उद्योगधंदा मिळत नाहीं अशी एकसारखी सर्व बाजूंनीं ओरड ऐकू येत असतां व त्यांच्याहून निदान लोकदृष्टया तरी कमी शकलेल्या त्यांच्या कित्येक लोकबांधवांस ग्रंथकाराचा धंदा आपल्यापरी चांगला किफायतशीर होत असतां त्यांच्यापैकीं इतक्या थोड्या मंडळीचेंच लक्ष त्या धंद्याकडे लागावे याचें विशिष्ट कारण काय आहे हें समजत नाहीं. जुन्या ग्रंथांचे प्रकाशक, भाषांतरकार, अथवा निरनिराळ्या विषयांवर स्वतंत्र ग्रंथ लिहिणारे यांची ठोकळ संख्या निदान ७०० हून कमी नाही; परंतु यांत पदवीधर ६० किंवा ७० च आहेत ह्मणजे त्यांचें प्रमाण १:१० असें पडतें. हा दोष कोणत्याही व्यक्तीचा नसून ज्या पद्धतीनें त्यांना शिक्षण दिलें जातें त्या पद्धतीचा आहे. त्यांच्या शिक्षणक्रमांत परभाषेसच सर्वथैव महत्व दिलें गेलें असल्यामुळे स्वभाषेचें अध्ययन करून राष्ट्रीय वाङ्मयांत भर टाकण्याच्या बुद्धीचा त्यांच्यामध्यें अलंत अभाव असतो. या बेपर्वाईचा व निष्काळजीपणाचा दिवसेंदिवस रून निष्पन्न होतें, ही मोठी दुःखाची गोष्ट होय. सामान्य गद्य वाङमय. शालोपयोगी पुस्तकें वजा जातां रिपेोर्टात भाषाविषय या सदराखालीं मोडणारीं पुस्तकें पुष्कळ असून त्यांची संख्या सुमारे १५० आहे. यांपैकी वाड्मयाच्या दृष्टीनें व अन्य बाजूंनीं उत्कृष्ट अशीं सुमारें ५० आहेत. पंडिता रमाबाई, व रा. पावगी यांची पुस्तकें व कर्सनदास मूळजींच्या इंग्लंड व इंग्रज यांच्या हकीकतीचें रा. भागवतांनी केलेंलें भाषांतर अशीं तीन पुस्तकें प्रवास या सदराखालों येतात: व हचि काय ताँ या विषयांत नांव घेण्यासारखीं पुस्तकें होत. रा. बापट यांचें सद्वर्तन, मधुमक्षिका, आणि शिरस्तेदार, नागेशराव बापट यांचा दादोजी कोंडदेव, आगरकरांचे केसरींतील, सुधारकांतील व इतर पत्रां. लि निवडक निबंध, गोळे यांचें ब्राह्मण आणि त्यांची विद्या, रा. चिं. वि. वैद्य - s