पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२ )

च्या पुस्तकांत आढळतो. तेव्हां या दिशेनें प्रथमतःजे प्रयत्न झाले ते बहुधा अशाच त-हेच्या गोष्टी लिहिण्याचे झाले. आरवी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी, हतीमताई, आणि पर्शिअन् भाषेतील गोष्टी वगैरे ग्रंथ हें त्या प्रयत्नाचें फळ होय. पहिल्या पन्नास वर्षांत चार पांच ग्रंथ होऊन आधुनिक मराठी कादंब-यांस त्यावेळीं नुकतीच सुरुवात झाली होती. व पुढील तीस वर्षात त्यांत इतकी भर पडली कीं लयांची संख्या ३०० वर गेली. यांपैकी सुमारें १८२ कादंब-यांची राजस्ट्रार आफ नेटिव्ह पब्लिकेशन्स यांनीं आपल्या यार्दीत व रिपोर्टात विशेष स्तुति केली आहे. नाटकांपेक्षां कादंब-यांत भाषांतरावर अधिक भर दिसून येतो. संस्कृत, उर्दू व पर्शिअन भाषांतील नमुन्यांवर ब-याच मनोरंजक कादंब-या झाल्या आहेतच पण सर वाल्टर स्कॉट, बुलवर, लिटन, रिनॉल्ड्स, जॉन्सन,स्विफ्द्,डिफी, वगैरे इंग्रज ग्रंथकारांचें व बोक्याशिओ आणि ड्यूमास सारख्या इटालियन व फ्रेंच ग्रंथकारांचें अनुकरण करण्याचीही कांहीं मराठी कादंबरीकारांस स्फुर्ति झालेली दिसून येते. असें आहे तरी मराठी कादंब-यांत स्वत:चा असा कांहीं विशिष्ट गुण आहेच. नाट्यग्रंथांप्रमाणेच त्यांचेही दोन भाग करीतां येतात.

श्रेमाच्या द्वारा मनुष्याचे सामान्य धर्म जागृत करणा-या व देशकालवर्तमान ह्या गोष्टींनी अबाधित अशा कादंब-या पहिल्या वर्गात मोडतात; ब-यांचा दुसरा वर्ग होय. या देशकालादि गोष्टींनीं परिच्छिन्न असून त्यांत सांप्रत कालांत अनुभवास येणा-या अनेक परिस्थितींचें व घोंटाळ्यांच्या प्रर्सगाचें चित्र रेखाटलेलें असतें. प्रेमबंधन, विचित्रपुरी, मंजुघोषा, सुतामाला मोचनगड, वेषधारी पंजाबी, अनाथ पांडुरंग, नारायणराव आणि गोंदावरी वगैरे पहिल्या वर्गातील नमुनेदार कादंब-या होत. नागेशराव बापट, आणि हरि नारायण आपटे यांचे ग्रंथ दुस-या प्रकारच्या कादंब-यांची उत्कृष्ट उदा’ हरणें आहेत. रा. आपटे यांच्या ' पण लक्ष्यांत कोण घेतो ? आणि 'आजकालच्या गोष्टी 'व बापटांच्या 'वाजीराव पेशवा' आणि 'पानिपतची मोहमि'। या कादंबच्या विशेष नांवाजण्यासारख्या आहेत. नाटकाप्रमाणेंच कादंब-यांकडेही आमच्या पदवीधरांचें लक्ष वेधलेलें दिसत नाही. सरकारी यादींत ज्या '2°या कादंबरीकरांचीं नांवें आढळतात त्यांत-रानडे, कानेटकर, ऑगाशे, भिडे, कृष्णराव माधव, आणि गुंजीकर या सहा सात 亭