पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( R < ) यंत्र, आगगाड्या, कांच, फटाके वगैरे दारुसामान, रंगविणे, वगैरे विषयांवरही स्वतंत्र ग्रंथ झाले आहेत. येणेंप्रमाणें चरित्र, इतिहास, राजनीति, कायदा, वैद्यक, तत्वज्ञान, शास्त्र SN a आणि कला वगैरे विषयांचें पर्यालोचन झालें. नाटक, कादंबरी, व गद्य निबंध, ह्या राहिलेल्या तीन विषयांचें विवेचन पुढील भागांत येईल. RTT 8 T. नाटकें कादंब-या आणि गद्य निबंध. ニでエミー मराठी वाङमयाच्या ज्या सर्व शाखांचें-ह्मणजे चरित्र, इतिहास, राजनीति, कायदा, वैद्यक, तत्वज्ञान, शास्त्र आणि हुनर वगैरेचें-वरतों पर्यालोचन केलें आहे, त्या शाखांत स्वतंत्र रचनेची स्फूर्ति इंग्रेजी वाङमय अथवा शास्त्र यांच्या अध्ययनानेंच मुख्यत्वें झालेली आहे. हे ग्रंथ जरी केवळ भाषांतरात्मक नाहीत तरी त्यांपैकीं पुष्कळांत नवीन संस्कृतीची झांक स्पष्टपणें मारते; आणि ह्यणूनच ज्या परकीयं नमुन्यांवरून अथवा मूळग्रंथांवरून ते तयार केलेले आहेत त्यांचा ठसा त्यांत उठलेला दिसतो; आणि कांहीं अंशीं असा प्रका होणें अपरिहार्यही आहे. या शाखांतील ग्रंथ, जुनें नवें व पूर्व पश्चिम, यांच्या संयोगाचे द्योतक आहेत; आणि त्यांत नव्या व पाश्चिमात्य विचारपद्धतीचा पगडा जुन्या व राष्ट्रीय विचारसरणीवर असावा हें सहाजिक आहूं. अॅ२ 'रािस्थतीत राष्ट्राची बुद्धिमत्ता दर्शविणारी खरी स्वतंत्र ग्रंथरचना नाटक, कादंब-या व सामान्य गद्य वाङाय यांतच आढळून येण्यासारखी असते. कारण या विषयांत राष्ट्रीय भावनांस आपले विशिष्ट गुण प्रदर्शित करण्यास पृष्ण अवसर सांपडतो, आणि भाषांतरापासून होणा-या स्फूर्तीचें वर्चस्व या विषयांत इतर विषयांपेक्षां कमी असतें. नाट्यावर मराठीत पुरातन स्वतंत्र ग्रंथ मुळीच नव्हते हें सांगितलेच आहे• याचें कारण एवढेंच कीं महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाकडे लक्ष दिलें असतां