पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २७ ) विद्युत्र, लोहचुंबक, उष्णता आणि कोळसा या विषयांवरही पुस्तकें झालीं आहेत. या पुस्तकांपैकीं प्रो. मोडक यांचीं रसायनशास्त्र व सृष्टिशास्त्र ( Natural Philosophy ) हीं पुस्तकें केवळ बालबोध पुस्तकांहून ज्यास्त योग्यतेची असून प्रमाणार्ह आहेत. ज्योति:शास्त्रावर बालबोध मालेशिवाय रा. दीक्षित, केळकर व चिटणीस यांचे स्वतंत्र ग्रंथ झाले आहेत. रा. दीक्षितांचें ज्योतिर्विलास हें पुस्तक चांगलें वाचनीय असून मनोवेधक आहे. याच ग्रंथकाराने 'भारतीय ज्याति:शास्त्राचा इतिहास ” ह्मणून आणखी एक पुस्तक फार परिश्रम घेऊन लिहिलें आहे. कै. ज. बा. मोडक यांनीं भास्कराचार्याच्या ग्रंथांतील ज्योतिषशास्त्राच्या भागाचें व वेदांगज्योतिषांचेंही भाषांतर केलें. रा. दक्षित आणि मोडक यांनीं ज्योतिषांतर्गत गणितांत निरयणपद्धतीऐवजीं सायनपद्धतीचा प्रचार सुरू व्हावा व तदनुरूप पंचांगाचें संशोधन व्हावें ह्मणून आमरण तरफदारी केली. नीतिशास्त्राचीं मूलतत्वें (1)ata of Ethics) या स्पेन्सरच्या ग्रंथांचें भाषांतरप्रो. भानूचें ‘ न्याय शास्त्राचीं मूलतत्वें; " स्पेनसरच्या ‘ शिक्षण या ग्रंथाचें सहस्र, बुद्धयांचें भाषांतर; रा. फडके यांची स्पेन्सेरीय सूत्रमाला-वगैरे पुस्तकें मानसशास्त्र आणि नीतिशास्त्र या सदराखालीं नोंदलेली आहेत. रा. बोडस यांची अद्वैतमीमांसा, व माक्समूलर साहेबांच्या हिब्बर्ट व्याख्यानांचे रा. कानिटकरांचें भाषांतर हीं पुस्तकेंही या ठिकाणीं नमूद करण्याच्या लायकीचीं आहेत. रा. ग. ज. आगाशे यांचें अर्थशास्त्र हें अर्थशास्त्रावरील उत्तम पुस्तक होय. रा. मुळे यांच्या हिंदुस्तानांतील सांपत्तिक द्रव्यें (Industrial. Wealth ). फारच उपयोगाचीं झालीं आहेत. वर सांगितल्याप्रमाणें वाङमयाच्या 'याच दिशेकडे पदवीधरांचें लक्ष विशेष लागलें आहे असें दिसतें. सर्वोत्तम म्हणून जेवढे ग्रंथ आहेत तेवढे त्यांचेकडूनच झालेले आहेत, व योग्यतेच्या आणि संख्येच्या मानानेंही त्यांचें प्रमाण पुष्कळ दिसून येतें. हुन्नरीवरही कांहीं उपयुक्त ग्रंथ झाले आहेत. रा. गुप्ते व राजे यांचें 'कृषिकर्मविद्या' रा. qRgñ zqiñä "TT2qriq Tgiri (InstrumentS and vocal nmusic ) पार्वतीबाईचें 'सूपशास्त्र' आणि रुक्मिणीबाईचें 'शिवणकाम' वगैरे पुस्तके या वर्गातील होत. याशिवाय चित्रकला (Drawing ); मल्लविद्या, तारा