पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २९ ) त्यांत लोकशिक्षणाचें व लोकरंजनाचें कार्य रंगभूमीच्या द्वारा करीत अस ल्याचा परिपाठ दिसून येत नाही. पहिल्या ५० वर्षांत या दिशेनें झालेली प्रगति रा. परशुरामपंत गोडबोले व दुसरे इतर शास्त्री यांनीं संस्कृतावरून केलेल्या १० नाटकांच्या रूपानें दिसून येते. त्यानंतरच्या तीस वर्षात भाषांतररूपाने झालेल्या नाटकांची संख्या सुमारें तीस होती व ती फारशी मोठी आहे असें नाहीं. तथापि या ग्रंथांत शेक्सपीयर व गोल्डस्मिथ यांच्या नाटकांची व संस्कृतांतील थोड्या उत्कृष्ट नाटकांचीं भाषांतरें आलीं आहेत. स्वतंत्र नाटकें सुमारे ३०० शें असून ह्या संख्येचें प्रमाण भाषांतररूपानें झालेल्या नाटकांच्या संख्येहून अतिशयच मोठे आहे. यावरून विद्वानांचा ओढा या विषयाकडे विशेष आहे हें निर्विवाद सिद्ध होतें. आणि त्या अभिरुचीचें, व जी पेरणी त्यावेळीं झाली तिचें पीक पुढें अलोट आलें असें ह्मणण्यास हरकत नाहीं. सांगली येथें स्थापन झालेली पहिली नाटकमंडळी पुणें मुंबई येथे १८५३ मध्यें येऊन नाट कद्वारा लोकांच्या मनोरंजनाचें काम करूं लागली, त्यावेळीं तीं पहाण्यासाठीं लोकांच्या किती उड्यावर उड्या पडत याची आठवण हठ्ठीं हयात असलेल्या त्यावेळच्या लोकांस होत असेल. या नाटकमंडळीनें जो या कामीं हिय्या केला त्याबद्दल त्यांस लोकाश्रयद्वारा उत्तम मोबदला मिळाला. कारण पूर्वी उत्सवांत व जत्रांत होणा-या दक्षिण कर्नाटकांतील लोकांच्या दशावतारी नाटकांपेक्षां या नाटकांत प्रेक्षकांचें मनोरंजन अधिक होत असे. सांगली येथील मंडळीस उत्तम लोकाश्रय मिळूत आहे हें पाहून दुस-या अनेक मंडळ्यांनी तिचें अनु. करण केलें; व सर्व मोठमोठ्या शहरातूंन नाटकगृहें बांघण्यासही सुरवात होऊं लागली, आणि आतां तर एक दोन नाटकग्हें नाहींत असें एकही मोटें शहर सांपडणार नाही. सांगली येथील नाटकमंडळीचे रा. विष्णुपंत भावे ह्मणून कोणी एक पुरस्कर्ते होते. त्यांना या धंद्यांत यश मिळालेलें पाहून त्यांचे ज्या मंडळीनें अनुकरण केलें त्यांत रा. किर्लोस्कर, डोंगरे, पाटणकर, साठे वगैरे मंडळी विशेष नांव घेण्यासरखी होती. या नवीन उत्पन्न झालेल्या नाटकाच्या अभिरुचीमुळे नाट्यवाङ्मयाच्या अभिवृद्धीस चांगलें उत्तेजन मिळालें. प्रारंभ नाटकमंडळीच्या व्यवस्थापकाचें व नाटकें लिहिण्याचें काम बहुधा एकाच यतीकइन होत असे, परंतु अलीकडे हीं दोन्हीं कामें पृथक माणसांकड़न केलीं जातात. पूर्वीचीं नाटकें मुख्यत्वें महाभारतरामायणादि पौराणिक गीछे च्या संविधानावर रचलेलीं असत; आणि अझनही मराठी भाषेतील एकंदरनाटकांत पैौराणिक नाटकांचाच भरणा जास्त दिसून येईल. m-He