( २३ ) चरित्रनायकाचा मान मिळाला आहे. यांच्या खालोखाल मराठ्यांच्या इतिहासांतील प्रसिद्ध पुरुषांस मान मिळाला आहे. शिवाजी व त्याच्या नंतरचे तीन राजे, पहिले दोन पेशवे, मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, नाना फडणवीस, अहिल्याबाई, हरिपंत फडके, परशुराम भाऊ पटवर्धन, आणि बापू गोखले ही मंडळी आमच्या ग्रंथकारांची फार आवडती दिसते. दादाभाई नवरोजी, गवरीशंकर उदेर्शकर, बाळशास्त्री जांभेकर, झांशीची राणी, वगैरे अर्वाचीन मोठ्या माणसांचीं चरित्रे झालीं आहेत. हिंदुस्थानांतील मुसलमानी राजांत अकबर व औरंगझेब यांचीं पृथकू चरित्रे झाली आहेत. यांपैकीं महादजी शिंदे, परशुरामभाऊ पटवर्धन, नाना फडणवीस, एकनाथ वगैरे थोर व्यक्तींचीं चरित्रे तर दोन दोन तीन तीन चरित्रकारांनीं पृथकू वर्णिली आहेत; आणि यांपैकी कांहीं चरित्रे इतकीं लोकप्रिय झाली आहेत कीं त्यांच्या कित्येक आवृत्त्या निघाल्या आहेत. एकंदरींत चरित्रकारांनीं आपल्या ग्रंथांनीं मराठी वाङमयाची फारच उत्तम सेवा केली आहे. या ग्रंथकारांच्या नांवाचा विचार नीट लक्ष देऊन केला असतां जी एक गोष्ट सुचते तिचा येथें उल्लेख करणें फायदेशीर आहे. ती गोष्ट ही कीं वर सांगितलेल्या ७० चरित्रकारांत पदवीधरांची संख्या जेमतेम सात आहेभानु, पावगी, नातु, कानिटकर, माडगांवकर, लक्ष्मण कृष्ण चिपळूणकर आणि गुंजीकर-बाकीच्या ६३ त कांहीं युनिव्हर्सिटीत गेलेले व कांहीं न गेलेल आहेत. भाषांतरकारांत पदवीधरांची बरीच भरती दिसते. संस्कृत किंवा इंग्रजी ग्रंथाचीं भाषांतरें करणा-या सुमारें ७६ भाषांतरकारांत आपल्या फार नामांकित अशा २५ पदवीधरांची नांवें आहेत. त्यांपैकी येथें कांहींचा केवळ नामनिर्देश मात्र केला आहे. ते:-पंडित, कुंटे बंधुद्वय, का. त्रिं. तेलंग, रा. महाजनि, आगरकर, ज. स. गाडगीळ, आपटेद्य, रा. आगाशे, रा. भानु, रा. पावगी, रा. रानडे, रा. पटवर्धन, रा. कोल्हाटकर, रा. बोडस, रा. फडके, रा. कानिटकर, डॅॉ. गर्दे, सखाराम अर्जुन, पांडुरंग गोपाळ, शिवळकर, भिकाजी अमृत, आणि भाटवडेकर. इकडे भाषांतराच्या बाजूला पदवीधर आणि बिनपदवीधर याचें प्रमाण १:३ (७५पैकी २५,२६: ५० ) तर तिकडे चरित्रांच्या बाजूला वर सांगितल्याप्रमाणें तें १:९ (७० पै७ ७:६३ असें आहे. ह्यावरून त्यांनीं चरित्रांकडे विशेष लक्ष दिलेले दिसत नाहीं.
पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/28
Appearance