पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २२ ) ३६५, कायदा ४३, वैद्यक ७१, राजनीति २६, तत्त्वज्ञान ३७, धर्म ६७, शास्त्र ३२०, प्रवास १२, कविता ३५९; किरकोळ ११००, व शालोपयोगा ८००. निरनिराळ्या विषयांवरील पुस्तकांचें जें प्रमाण या २२ वर्षात दिसून आलें । तेंच सर्व तीस वर्षांच्या कालास लागू पडेल असा अदमास आहे. या प्रमाणांवरून विद्वानांनी आपल्या प्रयत्नांचा मुख्य रॉख मराठी वाङ्मयाच्या उणीवा भरून काढण्याकडे धरिला होता; व ज्या गोष्टींची त्यांत अगोदरच रेलचेल होती त्यांकडे लांनीं आपलें लक्ष कमी पुरविलें असें सिद्ध होतें. किरकोळ पुस्तकें व शालेोपयोगी पुस्तकें वजा जातां-आण हीं सर्व पुस्तकांच्या चवथ्या हिशानें आहेत-बाकीच्या नवीन पुस्तकांत चरित्र, शास्त्र, तत्वज्ञान , धर्म, राजनीति, कायदा, वैद्यक आणि प्रवास या विषयांवरील ग्रंथसंख्या असावी त्याहून बरीच कमी आहे. प्रथमत: चरित्रांकडे वळू. पूर्वीच्या ५० वर्षांच्या काळांत, वर सांगितल्याप्रमाणें फक्त ५ च चरित्रे प्रसिद्ध झाली होती; परंतु पुढल्या तीस वर्षांत या संख्येंत बरीच भर पडली आहे. १८६४ च्या पूर्वी जीं पांच चरित्रे झाली त्यांची निवड कांहीं विशिष्ट तत्त्वावर झालेली दिसत नाही; परंतु हछीं चरित्र' मालिकेंत एक प्रकारची शिस्त व वैचित्र्य दिसून येतें; व लेखकांनीं थोर चरित्र नायंकांची निवड करितांना स्वदेशाकडे व यूरोप अमेरिकादि परदेशांकडे योग्यप्रमाणानें लक्ष पुरविलें आहे. असें आढळतें. यांपैकीं यूरोपीय थोर माणसांचीं चरित्रे महाराणी विहक्टोरिया, शेक्सपीयर, बुइल्यम् पिट, लेंॉर्ड बेकन, जोनाथन स्विफ्ट, सर ऐझाक न्यूटन, गोल्डस्मिथ, कॅब्डन, क्याफ्टन कुक्, डॅॉ. लिव्हिगस्टन ब्राडले, आनिविझांट, व इतर थोर इंग्रज ग्रहस्थांचीं मागल्या पिढींतील आंग्लेइंडियन कामगारांपैकीं लेंॉर्ड काईव्ह, सर थामस मनरो या ग्रहस्थांची: अमेरिकेतील पुढारी लोकांपैकीं जॉर्ज वाशिंग्टन, बेंजामिन फ्रांकलिन, व अध्यक्ष लिंकन आणि गाराफेल्ड यांचीं; आलेक्झांडर दि ग्रेट, सॅक्रटीस, डेमॉसेष्थनिस वगैरे ग्रीक ग्रहस्थांचीं; नेपोलियन बोनोपार्ट, पीटर दि ग्रेट, रशियाची काथे राईनं राणी, कोलंबस वगैरे यूरोपीय माणसांचीं चरित्रे यांत आलीं आहेत. या हिंदुस्थानांतील थोर माणसांत साधु, संत, कवि व धर्मसंस्थापक यांस अग्रमान मिळाला आहे. रामदास, एकनाथ, ज्ञानेश्वर, तुकाराम, वामनपंडित, जयरामस्वामी, नामदेव, बुद्ध, शंकराचार्य, राजा राममोहनराय या प्रत्येकास 剑