पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४ ) या भिन्न प्रमाणांवरून होणारा बोध अगदीं स्पष्ट असल्यामुळे त्यासंबंधीं जास्त लिहिणें नलगे. आतां चरित्रविवेचनानंतर सहजच इतिहासविवेचनाची पाळी येते; कारण इतिहास ह्मणजे राष्ट्राचें चरित्र होय. पहिल्या ५० वर्षांच्या कालांत मरेकृत इतिहासावरून भाषांतर केलेला बाळशास्त्री जांभेकरांचा 'हिंदुस्थानचा इतिहास', एल्फिन्स्टनच्या 'हिंदुस्थान' या पुस्तकाचें भाषांतर, आणि हरि केशवजी यांचा इंग्लंदच्या इतिहासाचें संक्षिप्त वर्णन इतकेच ग्रंथ काय ते इतिहास या सदराखालीं झाले होते. त्यानंतरच्या ३० वर्षांत जुन्या गद्यात्मक बखरी प्रसिद्ध केल्या गेल्या हें वरती आलेंच आहे. या बखरींचा संग्रह बराच मोठा झाला आहे. याशिवाय इंदूरचे माजी दिवाणसाहेब रा. कीर्तने यांनीं मालक्रम साहेबांच्या मूळ ग्रंथावरून भाषांतररूपानें केलेला 'मध्यहिंदुस्थानचा इतिहास', तुर्क व राशयन लोकांचे लढाईचा इतिहास, फ्रान्स देशांतील राज्यकान्तीचा व फ्रान्स व जर्मनीच्या युद्धाचा असे दोन संक्षिप्त इतिहास; आणि g*** ***:tift bgruff' (Story of the nations) ZT gasf ग्रंथमालेच्या आधारानें लिहिलेलें ग्रीस, रोम, फ्रान्स, जर्मनी, पर्शिया, इजिप्त, काथेंज, असीरिया, तुर्कस्थान, राशया आणि स्पेन या देशांचे इतिहास, वगैरे पुस्तकें प्रसिद्ध झाली. गोवें, सिंहलद्वीप, कूर्ग, भोपाळ, बुंदेलखंड, कोल्हापुर, दक्षिणमहाराष्ट्रांतील संस्थानें इल्यादिकांचे पृथक् इतिहास, शिपायांच्या लढाईचा इतिहास, ख्रिस्ती मंडळींची बखर ( Christian Chuirch,) व विंचूरकर, दाभाडे, आंग्रे आणि शिंदे यांच्या घराण्यांचे सविस्तर इतिहास वगैरे आणखी ग्रंथही तयार झाले. इतिहास विषयावर ' झालेले हे मुख्य ग्रंथ होत; इतर पुस्तकें शालोपयोगी ग्रंथांत मोडतात. या इतिहासांचे कर्ते म्ह्णून जाँ २५ नांवें उपलब्ध जाहेत. त्यांत फक्त पांचच गृहस्थ पदवीवर आहेत तेव्हां चरित्रप्रकर्णी दिलेल्या मतास यांवरूनही पुष्टि येते. इतिहासानंतरची पाळी राजनीतीची होय. १८६४ पूर्वी राजनीतीवर एकही पुस्तक प्रसिद्ध झालेलें नव्हतें. परंतु त्यानंतर भाषांतरद्वारा अथवा स्वतंत्र रीतीनें या विषयांत झालेले प्रयत्न चांगले दृग्गोचर होऊं लागले. केवळ काँग्रेसचे रिपेोर्ट बाजूला ठेवले तरी या विषयावर ब-याच योग्यतेचे असे २० मंथ झाले. ‘इंडिया अँड कॉलनीज' ('हिंदुस्थान व ब्रिटिश वसाहती')