पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २१ ) होणार नाहींत. वरील पुस्तकांत शालोपयोगी एकही पुस्तक नसल्यामुळे,तीं छापणा-या ग्रंथकारांस, आपल्या श्रमाच्या व धाडसाच्या मोबदल्यासाठी, केवळ सामान्य वाचकवर्गाच्या एकदेशीय आश्रयावरच अवलंबून रहावें लागलें. वाचनाच्या या अभिरुचीस योग्य वळण लावून प्रोत्साहन देण्याचें थोर कृत्य जर युनिव्हर्सिटीनें आपल्या हाती घेतलें तर वाचकवर्गाची संख्या पुष्कळ वाढेल, आणि आपल्या गद्यवाङमयाची अभिवृद्धि सर्वदिशांनी व योग्य प्रमाणानें लौकरच होईल अशी आशा बाळगण्यास' फारशी हरकत वाटणार नाही. आणखीं चुकल्यामाकल्या ग्रंथकारांकडून कसें बसें होणारें सांप्रतचें अभिवृद्धीचें काम झपाट्यानें सुरू होऊन त्यास एक प्रकारची शिस्त लागेल. या योगानें संस्कृत ज्ञानामृताची जशी आम्हांस गोडी लागली आहे व तें जसें आम्हांस मानवलें आहे, त्याचप्रमाणें पश्चिम यूरोपांतील ज्ञानामृताचा तितक्याच रासकतेनें आस्वाद घेण्याची व तें पचविण्याची पात्रता आम्हांस येईल. येणेंप्रमाणें जुन्या मराठी ग्रंथाचें प्रकाशन, आणि संस्कृत व इंग्रजी ग्रंथांचीं भाषांतरें, हे प्रमुख ओघ मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या प्रवाहाचा विस्तार किती वाढला आहे याचें थोडेसें सविस्तर विवेचन झालें. आतां ख-या स्वतंत्र ग्रंथाच्या विवेचनाकडे वळू. जुन्या गद्यपद्यग्रंथांचें प्रकाशन आणि इतर भाषांतील भाषांतरें यांची कोणी कशीही किंमत करो, परंतु एकाद्या देशांत विद्येची खरी कळकळ आहे कीं नाहीं व असल्यास ती कितकितपत जोमदार आहे याची परीक्षा करावयाची असल्यास त्या भाषेत नवीन व स्वतंत्र ग्रंथांची विपुलता व विविधता किती आहे याची छाननी करणें हाच एक उत्तम मार्ग आहे. वास्तविक ह्यटलें तर हे स्वतंत्र ग्रंथ भाषेचा प्राणच होत; ह्मणून ह्या भागाचें विवेचन अत्यंत लक्षपूर्वक केलें पाहिजे. पुन्हा छापलेले ग्रंथ व भाषांतरें यांखेरीज वरील तीस वर्षात नवीन प्रसिद्ध झालेल ग्रंथ जवळजवळ ५००० आहेत. यांपैकी २२ वर्षातील ( १८६५-७३ आणि १८८४-९६) ग्रंथांची सविस्तर माहिती उपलब्ध आहे, व तीवरून या पुस्तकांची विल्हेवारी करण्यास फार सोईचें झालें आहे. या कोष्टकांवरून असें दिसतें कीं या काळांत खालीं सांगितल्याप्रमाणें निरनिराळ्या विषयांवर ग्रंथ झाले; चरित्र ९६, नाटक ३३६, कादंबरी २७८, इतिहास 1२०, भाषा