पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २० ) वर्धन कुरुंदवाडकर, यांस दिलें पाहिजे. त्यांची मराठी ग्रंथकार व कवि या ` नाल्यानें सर्वत्र चांगली प्रसिद्धि आहे. तत्वज्ञान विषयांत भाषांतररूपानें इंग्रजींतून आलेल्या ग्रंथांत स्पेन्सर यास अग्रमान मिळाला आहे. प्रो. माक्समूलर, जॉन्स्टयूअर्ट मिठ्ठ, आणि लॅर्ड बेकन हे त्याच्या खालोखाल येतात. याशिवाय मार्क्स आरिलियस् याचीं atqqqờ 3ȚIrsî fa qarqT ặRIąörkö, j'q ( Treatise on the god) व इतर ग्रंथ यांचीही भाषांतरें झालीं आहेत. एल्फिन्स्टनचा हिंदुस्थानचा इतिहास, ग्रॉट डफू व मरेचा इतिहास यांचीं भाषांतरें जीं पहिल्या काळांत झालीं म्हणून सांगितलीं, याशिवाय वर सांगितलेल्या ३० वर्षांत ग्रीस, रोम, काथेंज, पर्शिया, आसीरिया, तुर्कस्तान, रशिया, स्पेन येथील मूर, इजिप्त, चीन यांच्या संक्षिप्त इतिहासांची मालिका व सिंहलद्वीपाचा इतिहास असे ग्रंथ इतिहास विषयावर प्रसिद्ध झाले. हें काम मुख्यत: श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या उदार आश्रयाचें फल होय. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. मेनचें व्हिलेज कम्युनिटीज् (ग्रामसंस्था), माशिआव्हेलींचें 'प्रिन्स “ (राजपुत्र), सीलांचें एक्सपॅन्शन् ऑफ इंग्लंड (इंग्लंडचा विस्तार), या पुस्त' कांच्या भाषांतरांनीं महाराष्ट्र वाड्यांतील राजनीति विषयाची फारच उत्तम आभवृद्ध झाली. येथवर वर सांगितलेल्या तीस वर्षात भाषांतरद्वारा मराठी वाङमयाची विशेष महत्वाची आभिवृद्धि कशी झाली याचें त्रोटक वर्णन झालें. एकंदरींत आमच्या उत्तम ग्रंथांत चांगली ठळक भर पडली आहे. आणि स्पेन्सर, माक्सूमृलर, र्मिक्ष? सीले, मेन, शेक्सपीयर, गोल्डस्मिथ, जॉन्सन् , सर वाल्टर स्कॉट, लॉर्ड वेकन’ सर बूलवर, लिटन, बकल, डीफी, स्विफ्ट्, बनियन, स्माईल्स, आणि लवॉक, यांच्यासारख्यांच्या नमुनदार ग्रंथाची ती भर आहे, हें आपल्या प्रचंड ४ जागृतीचें द्योतक होय. या जागृतीस जर वरिष्ठ विद्याधिका-यांकडून प्रोत्साहन मिळालें तर आमच्या वाड्याच्या सर्व शाखा अर्वाचीन युरोपांतील अनेकविध व अपूर्व अशा ज्ञानफलांनी अगदीं लौकरच लोंबून जातील यांत तिळम्राय संशय नाही. या प्रोत्साहनाच्या व प्रेरणेच्या अभावीं सुव्यवस्था व तारतम्य राखणें, आणि निरनिराळ्या ग्रंथकारांची व ग्रंथांची निवड करणें या गोष्टी