पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९ ) १२ जुलिअस सीझर. १३ अन्टाने अँड लिओपाट्रा ( वीरमणी आणि शृंगारसुंदरी). १४ अथेछो (थुंजारराव). १५ तिसरा रिचर्ड. १६ टेंम्पेस्ट (तुफान). १७ रोमिओ अँड जुलिएट (प्रतापराव आणि मंजुळा; शशिकला आणि रत्नपाल). १८ ट्रेल्फ्थ नाईट. दुसरीं इंग्रजी नाटकांची भाषांतरें ह्मणजे गोल्डस्मिथची (शी स्टुप्सू टु कॅॉकर (विजयजिगीषा, धुंडिराज. स. जोशी. समजुतीचा घोटाळा. बर्वे. ) व (द गुड् नेचर्डमान्, सुशील गृहस्थ) हींच कायतीं होत. संस्कृत नाटकासंबंधानें पाहिलें तर त्यांतील सर्व प्रसिद्ध नाटकांची भाषांतरें झालेली आहेत. त्यांपैकीं शाकुंतलासारख्याचें भाषांतर तर निरनिराळ्या चार पांच ग्रंथकारांनी केलेलें आहे. शाकुंतल, मृच्छकटिक, उत्तररामचरित, विक्रमोर्वशी, मुद्रराक्षस, प्रबोधचंद्रेोदय, वेणीसंहार, मालतीमाधव, मालविकाश्ममित्र, रत्नावलि आणि प्रसन्नराघव ही त्यांतील प्रमुख नाटकें होत. कादंबरीच्या बाबतींतहीं इंग्रजी व संस्कृत भाषांतरद्वारा अशीच कामगिरी झाली आहे. सर वॉल्टर स्कॉट, सर बुल्वर लिटन, रेनाल्ड्स् यांच्या कादंब-या व जॉन्सन्, डीफो, स्विफ्द् आणि बनिअन् यांचे ग्रंथ, तसेंच बोकाशिओ, रेनान, आणि डायूमास वगैरे परकीयांचे ग्रंथ कादंबरीकारांस फारच उपयोगी पडले आहेत. कादंबरी, बृहत्कथासार, विश्वगुणदर्श, वगैरे संस्कृत ग्रंथांच्या भाषांतरानेंही मराठी कादंब-यांत पुष्कळ भर पडली आहे. तत्वज्ञान विषयावरील पुस्तकांत फारसें वैचित्र्य दिसून येत नाहीं. भगवद्रांता व तीवरील अनेक टीका यांवरच ग्रंथकारांची पुष्कळ मदार दिसून येते, ब-याचशा उपनिषदांचाही भाषांतरें झालेली आहेत. छांदोग्य, नारायण, ऐतरेय, तैत्तिरीय, आणि ईशावास्योपनिषद् ही त्यांतील मुख्य होत. प्रचलित तत्वज्ञानाचा रॉख वेदान्ताकडे आहे. तरी पण पतंजलीचीं सटीक योगसूत्रे, आणि सर्वदर्शनसंग्रह ह्यांचीही भाषांतरें झालेली आहेत. रा. कुंट्यांची षड्दर्शनचिंतनिका हें ब-याच श्रमाचें फळ आहे. रा. शंकर पांडुरंग । तांच्या वेदार्थयत्नाप्रमाणेच जुरी षड्दर्शनचिंतका अपूर्णच राहिली आहे तरी ह्या दोन पुस्तकांच्या योगानें मराठी वाङ्मयांत फार मौल्यवान ग्रंथांची भर पडली यांत संशय नाही. पुराणांपैकीं रामायण, भागवत, मत्स्य व गणेश इ. पुराणांचीं भाषांतरें झाली. शेवटल्या ग्रंथाचें श्रेय श्रीमंत बापूसाहेब पट