Jump to content

पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६ ) वखर या सारख्या थोड्या भाषादृष्टीनेही फार महत्वाच्या आहेत. आग्न्या पदवीधरांची उदाहरणें पाहून निरनिराळ्या घराण्यांचा इतिहास लिहियाचा स्फूर्ति कांहीजणांस झाली. व त्याप्रमाणें—रा. गुप्ते याचें 'प्रभुज्ञातातील प्रमुख पुरुष' विंचूरकर, दाभाडे, आंग्रे, यांचे इतिहास व नागपूरकर भोंसले, गायकवाड, शिंदे व होळकर यांच्यातील राजकत्र्यी पुरुषांच्या वंशाचे इतिहास वगैरे पुस्तकें प्रसिद्ध झाली. सारांश पुढें ज्या विषयी चर्चा केली आहे ते सर्व उत्तम अर्वाचीन इतिहास व चरित्रे या चांगल्या वळणाची साक्ष देत आहेत. आकर्थ साहेब व रा. तुकाराम शाळीग्राम यांनीं पोवाडे प्रसिद्ध केल्याचें सर्वांस महशूर आहेच. सिंहगडावरील पोवाड्यासरख्या कांहीं पोवाडयांवरून तर त्या कवींची प्रतिभा फारच उत्तम दर्जाची असली पाहिजे असें वाटतें. सांप्रत ह्या वखरी व हा पत्रव्यवहार छापण्याचें काम दुस-या मंडळीनें हातीं घेतलें आहे, व त्यांत कोणी पदवीधर नाहींत. मिरजचे वासुदेव शास्त्री खरे; सातारचे रापारसनीस, व पुण्याचे रा. आपटे व राजवाडे ही त्यांतील मंडळी होत. दोन मासिके फक्त या कामालाच वाहिलेली आहेत. जुन्या कविते संबंधीं वरतीं जे विचार न्यायमूर्तीनीं प्रगट केले आहेत ते या जुन्या गद्य वाङमयाच्या भागांसह बरोबर लागू पडतात. हिंदुस्थानांत इतिहासझानाचा पूर्ण अभाव आहे असा जो असद आमच्या तरुणांच्या मनांस बालपणापासूनच चिकटतो त्याचा पार नायनाद झाल्याखेरीज व त्यांस या तत्कालीन गोष्टींची व लेखांची खरी योग्यता किती आहे हें शिकविल्याशिवाय त्यांच्यांत ख-या ऐतिहासिक दृष्टीची व দ্বিদ্বন্দন্তু बुद्धीची खरी व कायमची वाढ सुरू होईल अशी आशा करणें अगदी व्यर्थ आहे, आणि वाङ्मयाच्या या भागांतील भावी सुधारणा व यश:पाति वरील गोष्टींवरच निःसंशय अवलंबून राहील. m0 mmu m"