पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ३ र. भाषातरं व रूपांतरें. (Adaptations.) --esse Sseas - जुनी कविता व गद्य बखरी यांचा येथवर विचार झाला. अर्वाचीन मराठी वाङमयाचा या पुढील अत्यंत चित्ताकर्षक भाग ह्मणजे संस्कृत व इंग्रजी ग्रंथांचीं भाषांतरें हा होय. १८६५-१८९५ पर्यंतच्या तीस वर्षात या सदराखालीं एक हजार पुस्तकें तयार झाली. १८६५-७३ आणि १८८४-१८९६ या २२ वर्षीची जी सविस्तर हर्कीगत उपलब्ध आहे, ती वरून असें आढळतें की, या कालांत जीं एकंदर ७०० पुस्तकें भाषांतररूपानें तयार झाली, त्यांत-चरित्रे १७, नाटकें ४८, कादंब-या ११३, इतिहास २६; भाषाविषयक १५, कायद्याचीं १२०, वैद्यकीचीं ३०, राजनीतिचीं ८, तत्वज्ञानाचीं ४०; धर्म ५२, भौतिक शास्त्र ६२, प्रवास २; कविता ३६; आणि किरकोळ २१०-अशी निरानराळया ग्रंथांची संख्या होती. संस्कृत व इंग्रजी ग्रंथांच्या भाषांतरद्वारा मराठी वाड्यांत ही जी भर पडली, तांत त्या त्या भाषांचा अंश आहे किंवा नाहीं व अस ल्यास त्यास प्राधान्य किती मिळालेलें आहे, ह्या प्रश्नांच्या चौकशीतच कायतें सार आहे. रिपोर्टात जेवढीं चांगलीं ह्मणून नांवाजलेली आहेत, तेवढ्यांचाच विचार केला तर अशीं १६० पुस्तकें संस्कृतांतून व १२० इंग्रजीतून, भाषांतरद्वारा मराठीत आली असें दिसतें. संस्कृतांतून झालेल्या भाषांतरांत चरित्र, इतिहास, व राजनीति,या विषयांवर ग्रंथ नाहीत हें कोणाच्याही लक्षांत येण्यासा. रखे आहे. या बाबतींत जी उत्तम भर पडली ती इंग्रजी ग्रंथाच्याच भाषांतरांनी होय. उलट पक्षीं कविता व धर्म यां विषयांस इंग्रजी भाषांतराची काडीमात्र मदत झाली नसून, तें सर्व क्षेत्र संस्कृत भाषांतरांनीं पूर्णपणें व्यापलेलें आहे. वैद्यक विषयांत इंग्रजी भाषांतराची जास्त भर पडली असावी असें वाटण्याचा संभव आहे खरा, परंतु, या बाबतींत, दोन्ही भाषांकडून मराठी वाकावयाच्या अभिवृद्धीस अगदी सारखीच मदत झालेली आहे. वास्तविक पाहिलें तर मराट्रांत आयुर्वेद शिकविण्याचे वर्ग सुरू झाले ह्मणूनच या विषयावरील इंग्रजी ग्रंथाची भाषांतरें जन्मास आलीं, नाहीतर त्यांस जग दिसलें नसतें. हीं विद्या°र्यांकरितां ह्मणून तयार केलेली पुस्तकें सर्व सामान्य लोकांसही उपयोग पई - ܐ