पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५) केला नाहीं तर आमच्या वाङमयाच्या या शाखेत आधक प्रगति होणें अगदीं अशक्य आहे ही गोष्ट आतां अगदीं उघड आहे. एकाद्या कोमल रोप्यावर कलम करावयाचें असल्यास तें मातृभूमीत उगवून त्याची पाळेमुळे त्या जमीनीत चांगलीं खोल गेलीं पाहिजेत नाहीं तर त्यावर केलेलें विदेशी कलम कधीही जोर धरून फोफावणार नाही. मूळच्या झाडास पाणी घालून त्याची मातृभूमीतच जेव्हां नीट जोपासन् र्वी तेव्हां त्यास घातुलें विदेशी खत लागू पडतें, आणि मग त्याच्यायोगानें फलाचा स्वाद व सौंदर्य आधिक वाढण्याचा संभव असतो. कवि जन्मावेच लागतात. हुकमाबरोबर ते तयार होत नाहीत. कवित्वाचा स्वाभाविक विकासच व्हावा लागतो तेथें हस्तलाघवाचें काम नाही. आपल्याच वंशांतील महान् महान् कवींच्या स्फूर्तिदायक काव्यांचें बालपणापासून अध्ययन करून मोठमोठ्या बुद्धिमान पुरुषांच्या मनांत कवित्वाची ज्योत पुन्हा प्रज्वलित झाल्याशिवाय अर्वाचीन मराठी काव्याचा विकास होऊन त्यास उज्वल स्वरूप येण्याची आशा करण्यास मुळीच आधार नाहीं हें खास आहे. जुन्या कवितेसंबंधी व अर्वाचीन कवितेवरील तिच्या श्रेष्ठत्वाविषयीं जें वर सांगितलें तेंच बहुतेक अंशीं बखरी, कैफियती, व मराठी इतिहासांतील मोठमोठ्या प्रकरणांतील जो पत्रव्यवहार छापून पुन्हा प्रसिद्ध केला आहे त्याजविषयीं लागू पडतें. या अवाढव्य संग्रहांपैकी पहिल्या ५० वर्षांत कांहींएक छापून काढण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. रा. सा. का. ना. साने. व ज. बा. मोडक यांनी आपल्या राष्ट्राच्या जुन्या इतिहासाबद्दल जो योग्य अभमुान दर्शविला त्याचे पहिलें फूळ म्हणजे त्यांनी सुरू केलेले ? काव्यात संग्रह' नांवाचे मासिकपुस्तक हें होय. या मासिकांत जुन्या बखरी व प्रसिद्ध न झालेली कविता छापण्याचा त्यांचा उदात्त उद्देश होता. व तें काम त्यांनीं १२ वर्षे पर्यंत मोठ्या शिताफीनें केलें. अशारीतीनें प्रसिद्ध झालेल्या बखरचेि फुटकळ भाग स्वतंत्र मथरूपानं त्यांनीं छापले. त्यामुळे हछीं जवळजवळ मराठति। ४० ग्रंथ झाले आहेत या ग्रंथांत मराठ्यांच्या इतिहासांतील चटका लावणा-या अशा काळांतील गोष्टींचें पूर्ण व यथातथ्य वर्णन केलेलें सांपडते. यापैकी कांही बखरी १६ व्या शतकांत प्रसिद्ध झालेल्या अर्वाचीन युरोपीयन ইনিহাसाच्या बखरांच्या तोडांच्या आहेत; व त्यांपैकी भाऊसाहेबांची बखर व ԿIfՀ