( ७ ) जरी १४ हिंदुस्थानसबंधी व ६ इंग्लंदसंबंधीं आहेत-तरी वर सांगितल्याप्रमाणें वाङ्मयदृष्टया महत्वाचीं अशीं भाषांतरेंच होत. आपल्या वाङ्मयाचा एक विशिष्ट भाग ज्या अनेक बखरी त्या प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न या काळांत कोणींच केलेला दिसत नाहीं. त्याचप्रमाणें ग्रीस व रोम या देशांच्या इतिहासाची व यूरोप आणि अमेरिका यांच्या अर्वाचीन इतिहासाची ओळख मराठी वाचकांस करून देण्याचीही खटपट कोणी केलेली दिसत नाहीं. कल्पित कथासंबधानें विचार करितां “ आरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी ' झाल्यामुळे जुन्या गोष्टींच्या संग्रहांत भर पडली. परंतु अलीकडे ज्यास आपण कादंबरी ह्मणतों. तशा कादंब-या लिहिण्याची नुकतीच थोडीशी सुरवात त्या काळांत होत होती. गद्य वाङ्मयाच्या या शाखेत इतकें दैन्य असण्याचें कारण अगदीं उघडच आहे; तें हें कीं पुरातन इतिहास पुराणांत अशा कथांचा संग्रह विपुल असल्यामुळे त्या बाबतीत लोकांची जिज्ञासा तृप्त हेोई. व ह्यणून त्यांना अर्वाचीन कल्पित कथांची उणीवच भासत नसे. प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांत इतिहास व गोष्टी या ग्रंथांप्रमाणेच चरित्रांची संख्या फारच थोडी . असून ती असावी त्यापेक्षां कमी आहे. जी थोड्याबहुत योग्यतेची आहेत अशीं फारच थोडीं पुस्तकें या प्रथम काळांत छापलीं गेली. प्रवासवर्णनांची तर याहूनही अल्पता दिसून येते. आमच्या लोकांत धाडशीपणाचें पाणी विशेषसें वसत नसल्यामुळे छापल्या जाणा-या आमच्या गद्य ग्रंथांत या विषयास नेहमीं पुष्कळसें गौणत्वच मिळणार. या कालांत तत्त्वज्ञानावर पुष्कळ ग्रथ झाले असून त्यांची एकंदर संख्या पंचावन आहे. ह्या तत्त्वज्ञानाचा साधारण रोख वेदान्ताकडे असून त्याची मांडणी भगवद्रीतेवर केलेली आहे. केवळ धर्मावर तर असंख्य पुस्तकें झाली आहेत; परंतु त्यांत भोळसटपणाच्या आचारविचारांचा अतिरेक झाला आहे. पूर्वीची अंधपरंपरा सोडून देऊन योग्य मार्गाचें ज्यांत अवलंबन केलें आहे असा विष्णुबोवा ब्रह्मचारी यांचा वेदातीधर्मप्रकाश हा एकच ग्रंथ होय. त्यावेळीं त्या ग्रंथाकडे ब-याच लोकांचें चित्त वेधलें. वरील काळांत इंडियन कमिशनचें दोषाविष्करण व बॉवे असोशियनचे अहवाल हीं पुस्तकें जर जमेस न धरलीं तर राजकीय ग्रंथांचा पूर्ण अभावच होता असें ह्मणावें लागतें. शास्त्रीय विषयांवर एकंदर ७३ ग्रंथ झाले
पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/12
Appearance