पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( & ) 'राजा मदन' ह्या तीन नामांकेित कादंब-या झाल्या. 'विक्रमबक्तिशी” 'वेताळपंचविशी' 'शुकवहातरी' आणि 'बकासुर बखर' वगैरे याच सदराखालीं मोडणारी गोष्टीचीं पुस्तकें प्रसिद्ध झालीं. खंडेराव फडक्यांची 'शिपायांच्या बंडाची हकीकत' व 'इंग्लंदचा इतिहास, हरिकेशवजांचा 'इंग्रज लोकांचा इतिहास' 'कोल्हापूरचा संक्षिप्त इतिहास 'इजिप्तचा इतिहास' 'राशयायाच्या काथेराइनच्या राज्याचा इतिहास' वगैरे इतिहासाची पुस्तकें छापली गेली. जनार्दन रामचंद्र यांची ' हिंदुस्थानांतील कवींची चरित्रे,' विष्णु, मोरेश्वर भिडे यांचें 'सायरसचें चरित्र' विष्णुशास्त्री यांचें । नाना फडणविसाचें चरित्र' आणि भास्कर हरि भागवत यांचें 'राजा राममोहनराय? यांचें चरित्र वगैरे चरित्रात्मक ग्रंथ निर्माण झाले. १८६४ च्या पुढल्या तीस वर्षांच्या मराठी वाङ्मयाच्या पर्यालोचनाची जी ही प्रस्तावना दिली आहे तो संपविण्यापूर्वी १८१८ ते १८६४ था काळाच्या दरम्यान-ह्मणजे ज्या कांळांतील पुस्तकांचा हा कॅटलाँग केला हे त्या सर्व काळांत-मराठी वाङ्मयाची एकंदर स्थिति कशी होती याचें थोडेंसें विवेचन करणें अवश्य आहे. १८६४ च्या अखेरपर्यंत छापलेल्या केवळ मृाठी ग्रंथांची संख्या ६६१ होती. यापैकी गद्य ग्रंथ ४३१ व पद्य २३० होते. शालोपयोगी गद्य पुस्तकें ९८ असून त्यांत वाचन पुस्तकें, अंकगणितें’ इतिहास, भूगोल, व व्याकरण वगैरे पुस्तकें आलीं आहेत. त्यांपैकीं कांहीं *ांतरूप असल्यामुळे व कांहीं सरकारी हुकुमान्वयें तयार केली गेली असल्याळे यांत उद्दिष्ट हेतूच्या पलीकडे ह्मणण्यासारखे दुसरें कांहीं नाही. '!' त्यांचा येथे फक्त नामनिर्देश केला ह्मणजे बस्स आहे. परंतु कर्नल s जव्हिस, मेजरक्यांडी, सदाशिव काशिनाथ छत्रे, बाळशास्त्री जांभेकर, ' दादांबा पांडुरंग, आणि भास्कर दामोदर यांनों शालोपयोगी प्राथमिक पुस्तकें तयार करून फारच मेोठी कामगिरी केली असें ह्मटल्यवांचून रहावत नाही. शालोपयोगी पुस्तकें वजा जातां सुमारें ३२५ गद्य ग्रंथ प्रसिद्ध झाले होते. वाङ्मयाचा निरनिराळ्या सदरवारीनें विचार करितां जरी या पहिल्या |ाळात इतिहासाची लहान मेष्ठ २३ पुस्तकें आढळतात-व या २३ त ही زf+