पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिरूरकर), शशिकला जाधव लिखित ‘अनर्थाची फुले' (१९८९) आणि ‘सुकलेले अश्रू' (१९८३), शं. वि. जोशीरावांचे ‘मुलखावेगळी मुले' (), प्रकाश माळींचे ‘होरपळलेली फुले', (१९८९), रेणू गावसकरांचे ‘आमचा काय गुन्हा?' (२००५), किरण बेदीलिखित ‘तुरुंगातल्या सावल्या' (२००७) आणि 'व्हॉट वेंट राँग' (२००२), रस्त्यावरचे पोर' - एस. के. कुलकर्णी, श्रद्धा कळंबटेंचं ‘ओघळलेले अश्रू', मीना शेटेलिखित 'वंचितांचे विश्व (भाग १, २), डॉ. सुनीलकुमार लवटेलिखित ‘दु:खहरण' (२०१३), प्रदीप निफाडकर लिखित - ‘आभाळ पेलताना' ही नि अशी अनेक पुस्तके, स्फुट, सदर लेखन यांतून वंचित जगातील अत्याचारित व्यक्तींचे प्रश्न, समस्या, चित्र, संघर्ष समजतो. कार्यकर्ते त्यासाठी जिवाचे रान कसे करतात हे पाहून त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित होतो.
 मराठी वंचित कथावर स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपणास वाचायला मिळते तरी तिची स्वतंत्र नोंद प्रवाह म्हणून मराठी साहित्य इतिहास लेखक, संशोधक, समीक्षक घेत नाहीत याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. प्रा. श्री. म. माटेंचे ‘उपेक्षितांचे अंतरंग' (१९४१), विभावरी शिरूरकरांचा ‘कळ्यांचे नि:श्वास' (१९३४), प्रवीण पाटकरलिखित ‘फिल्डवर्क', 'सती', मिलिंद बोकीललिकित ‘उदकाचिया आर्ती' , 'झेन गार्डन', प्रतिमा जोशींचा ‘जहन्नम' (संपा. प्रा. पुष्पा भावे), विजया खाडिलकर लिखित 'लालबत्ती' (२०१३), शशिकला जाधवांची ‘धना' (१९९३), श्रुती पानसेलिखित ‘आधुनिक स्फूर्ती कथा’ ‘डेअर टू ड्रीम', डॉ. आनंद नाडकर्णीलिखित ‘हेही दिवस जातील' अशी पुस्तके उदाहरणे म्हणून सांगता येतात.

 तीच गोष्ट कादंबरीची. वंचितांच्या जीवनावर आधारित कादंब-यांमध्ये डॉ. शांता निसळ लिखित 'उंबरठा' आणि 'बंधन', डॉ. राजन गवस लिखित चौडकं' (१९८५) आणि ‘भंडारभोग' (१९८९), डॉ. आनंद यादव लिखित 'नटरंग', माधव कोंडविलकर लिखित ‘अनाथ', राजन खान लिखित ‘रसअनौरस' (२००९), 'चक्र' जयवंत दळवी (१९६३), विभावरी शिरूरकरांची ‘हिंदोळ्यावर' (१९३४) आणि 'बळी' (१९५०), पारू नाईकलखित 'मी कां नाही?' (२०११) मी मुक्त, मी मुक्त’ - शंकरराव खरात, वि. वा. हडपांची ‘गोदाराणी' या कादंबच्या परित्यक्ता, देवदासी, अनाथ मुले, हिजडे, अनौरस कुटुंबे अशी अनेक विषण्ण चित्रे पुढे ठेवतात. परित्यक्त व अत्याचारित स्त्रियांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाच्या विभावरी शिरूरकरांच्या दोघांचे विश्व (१९५७), 'उमा' (१९६६), ‘विरलेले स्वप्न' (१९३५), ‘शबरी', ‘जाई', डॉ. शांता निसळांच्या ‘राखण' (१९६६), ‘बेघर' (१९७५), ‘स्वर एका

मराठी वंचित साहित्य/७०