पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/70

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जीवनभर कार्य करणारे सेवाभावी व समर्पित कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपली अनुभव कथने लिहिली आहेत. ती आत्मपर शैलीत लिहिली गेली असली तरी परदु:खंकेंद्री आहेत. समाज व साहित्यविकासात भावजागर घडवून आणणाच्या या साहित्यकृती म्हणजे काही न करता आत्मकेंद्री जीवन जगणाच्यांना प्रेरणा देणाच्या या कार्य, कर्तृत्वाच्याच कहाण्या होत. मालतीबाई बेडेकर लिखित ‘घराला मुकलेल्या स्त्रिया व काळाची चाहूल' (१९६२), डॉ. शरच्चंद्र गोखलेंचे ‘जगावेगळे जग', अनुताई वाघलिखित ‘दाभोणच्या जंगलातून (१९९०), अनुताई भागवतांचे ‘बिल्वदल', विजयाताई लवाटे लिखित 'अनुभव', ‘आठवणीतल्या गोष्टी' (१९९६), ‘स्पर्श मानव्याचा' (२००६), विलास चाफेकरांचे ‘निहार' (२००२), किरण बेदींची ‘इट इज अलवेज पॉसिबल', ‘मजल दरमजल', माधव सानपांचे ‘तह' (१९९९), अमिता नायडूचे ‘प्लॅटफॉर्म नंबर झिरो' (२०११), मीरा बडवेंचे ‘टीम निवांत' (२०१३), लीला अल्वारिसांचे ‘मुले आणि गुन्हेगारी’, ‘समाजसेवा' त्रैमासिकाचे विभिन्न विशेषांक (विशेषतः ‘अनुभव कथन') या सर्वांतून सामान्य वाचकांना आश्चर्यकारक वाटणाच्या नव्या जगाची, वंचित जीवनाच्या वैविध्याची प्रचिती येते.
 वंचित विकासाच्या क्षेत्रात कार्य करणाच्या अनेक कार्यकर्त्यांची प्रेरक ‘चरित्रे' मराठी साहित्यात उपलब्ध आहेत. महात्मा फुले - व्यक्तित्व आणि विचार', प्रा. गं. बा. सरदार (१९८१), अण्णासाहेब कर्वे ‘सचित्र चरित्र - संपादक य. गो नित्सुरे (१९६३), महर्षी विठ्ठल राजमजी शिंदे - डॉ. गो. मा. पवार (२००४), पंडिता रमाबाई' - डॉ. सिसिलिया काव्र्हालो (२००७), ‘कर्मवीर भाऊराव पाटील - डॉ. ए. व्ही. मॅथ्यू, ‘हे विश्वचि माझे घर' (२०११), ‘मांदियाळी' (२०00) - सविता भावे, ‘बाबासाहेब जाधव (२००१), ‘हिरा ठेविता अंगणी' - प्रकाश पाठक (२००८), ‘आधारवड' - ‘अविनाश टिळक (१९९४), ‘ते खोड चंदनाचे' - शांता नारकर (२००६), ‘समर्पित जीवन' - मनोहर साखळकर (१९८७), डॉ. सुनीलकुमार लवटे लिखित ‘कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक' (२०१३), ‘प्रेरक चरित्रे (२०१३) आणि ‘निराळं जग, निराळी माणसं' (२०१३) या नि यांसारख्या असंख्य पुस्तकांतून महाराष्ट्रातील वंचितांच्या क्षेत्रात राज्यातील कानाकोप-यात काम करणा-या सामाजिक कार्यकर्त्यांचे जीवनकार्य समजते.

 वरील प्रकारचे वंचितांचे कार्य करणाच्या कार्यकर्त्यांनी 'केस स्टडी'च्या रूपात अनेक पीडित, वंचितांची, त्यांच्या संघर्षाची, जीवन यशस्वितेची व्यक्तिचित्रे, शब्दचित्रे, रेखाचित्रे शब्दबद्ध केली असून ती प्रेरक, थक्क करणारी वाटतात. घराला मुकलेल्या स्त्रिया’ - बाळताई खरे (विभावरी

मराठी वंचित साहित्य/६९