पान:मराठी रंगभुमी.djvu/96

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८०
मराठी रंगभूमि.


आहे. असो; हीं नाटकें अजून यावीं तितकों व यावीं तशीं रंगभूमीवर येत नाहींत. करितां कांहीं कांहीं चांगल्या नाटकमंडळींनीं ही गोष्ट मनावर घेतल्यास मराठी रंगभूमीची ही अडचण दूर होणार आहे. या बाबतीत कसे प्रयत्न झाले पॅहिजेत हा विषय स्वतंत्र असल्यामुळे त्यासंबंधानें या पुस्तकाच्या अखेरीस जे विचार प्रगट केले आहेत त्यांकडे वाचक लक्ष पुरवितील अशी आशा आहे.

सामाजिक विषयांवरील नाटकें.

 सामाजिक विषयांवरील अगदीं पाहलें नाटक हटलें ह्मणजे ‘ मेौर एलएल. बी. चा फार्स ’ हें होय. या फासणीत इंग्रजी शिक्षणामुळे आमच्या लोकांचीं हाडांचीं काडें वनून ते कसे निर्बल होतात हें मुख्य दाखविलें आहे. मेरेश्वर नांवाच्या एका एलूएलू. बी. परीक्षा पास झालेल्या इसमाचें एक पात्र यांत घातलें असून गर्भदानाचे वेळीं ते निरुपयोगी ठरल्याबद्दल त्याच्या बायकोकडून त्याची टर उडविली आहे. तसेंच इंग्रजी शिकलेली मनुष्य आईबापांचा किती मान राखतो. आपल्या पूर्वीच्या आचारविचारांस किती मह्त्व देतो, नव्या विद्येची त्याला किती घमेंड वाटत असतें वगैरे गोष्टीही यांत दाखविल्या आहेत, या नाटकाचे प्रयोग सांगलीकर वगैरे नाटकमंडळीनें पुष्कळ केले असून पुण्यासारख्या ठिकाणीं ते पाहण्याकरितां प्रेक्षकांची दाटी जमत असे.