पान:मराठी रंगभुमी.djvu/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८१
भाग १ ला.


सामाजिक विषयांवरील दुसरें नाटक हटलें ह्मणजे 'जरठेद्वाह' हें होय. या नाटकांत ह्माता-या नव-याबरोबर तरुण मुलीचा विवाह झाल्यानें काय दुष्परिणाम होतात हें दाखविलें आहे. याचे प्रयोग कोल्हापूरकर नाटक मंडळी केव्हां केव्हां करीत असे व ते बरे होत असत.
 सामाजिक विषयांवरील तिसरें नाटक कै० नारायण बापूजी कानटकर यांनीं लिाहलेलें 'तरुणीशिक्षण' हें होय. स्त्रियांना शिक्षण देऊन पुरुषांबरोबर हक्क द्यावेत; त्यांच्या पोषाखांत आणि वागणुकींत सुधारणा झाली पाहिजे; समाजांत प्रीतिविवाह व पुनर्विवाह सुरू झाले पाहिजेत; मूर्तिपूजा आणि सोंवळेंओवळें सब झुट आहे, सबब त्यांचा नायनाट केला पाहिजे; सुधारणेच्या कामांत जातिभेदू आड येतात ह्मणून ते निखालस मोडले पाहिजेत; बालविवाह व असंमत वैधव्य या चाली फार घातुक आहेत, सबब त्यांचा उच्छेद केला पाहिजे वगैरे जे विचार इंग्रजी विद्या शिकलेल्या आरंभींच्या सुधारक मंडळीच्या डोक्यांत घोळत होते व त्याप्रमाणें जी वागणूक होत होती त्याचे दुष्परिणाम या नाटकांत दाखविले आहेत. त्यांतून स्त्रियांना हल्लीचें शिक्षण दिलें ह्मणजे त्या कशा बिघडतात हें विशेष रीतीनें व्यक्त केलें आहे. हें व्यक्त करतांना भक्ष्याभक्ष्याचा विधिनिषेध न मानतां मद्यमांसाच्या अतिरेकानें प्राणहानेि करून घेणारे पदवीधर वकील; इंग्रजांच्या सर्व चालीरीती चांगल्या, त्यांचा