पान:मराठी रंगभुमी.djvu/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७९
भाग १ ला.


तयार झालें, व त्याचे उत्सवप्रसंगीं आणि इतर वेळीं जे प्रयोग झाले; त्यांत पुणें येथील सायन्स कॉलेजच्या ग्यादरींगच्या वेळीं झालेला प्रयोग बरा झाला. यानंतर ' गिलच्यांचा सूड अथवा पानपतचा मोबदला ' म्हणून एक चांगलें नाटक कोल्हापुरच्या एका कृबाकरितां तयार होऊन त्याचाही प्रयोग तेथें झाला. अशा प्रकारें गेल्या पंधरा वर्षात दहा, बारा ऐतिहासिक गद्य नाटकांचे प्रयोग झाले. या अवधींत वरील नाटकांखेरीज आणखीही कांहीं ऐतिहासिक नाटकें मराठींत तयार झाली आहेत; पण प्रयेोग झालेल्या नाटकांविषयींच येथें लिहावयाचें असल्यामुळे त्यांचा उल्लेख केला नाहीं. तसेच कांहीं ऐतिहासिक नाटकांचे प्रयोग संगीतांत झाले असल्यामुळे संगीत नाटकांविषयीं लिहितांना त्यांचा उल्लेख करण्याचें योजिलें असल्यामुळें, त्यासंबंधानें येथें कांहीं लिहिलें नाहीं. ऐतिहासिक नाटकांची लोकांना विशेष गोडी लागण्यास त्या नाटकांचे प्रयोग चांगले वठले पाहिजेत व शाहूनगरवासी मंडळीखेरीज इतर कोणत्याही कंपनीनें ते तसे वठविण्याकड़े लक्ष पहोचविलें नाहीं ऐतिहासिक नाटकांत कोठं कोठें विसंगृतपणा वर्गतो, व ही गोष्ट 'बाजीराव आणि भस्तानी' किंवा 'नागूयणराव पेशव्यांचा वध' या नाटकांवरून केोणाच्याही लक्षांत येईल. पण हा दोष ऐतिहासिक माहिती चांगल्या रीतीनें उपलब्ध झाल्याशिवाय जाणें दुरापास्त