पान:मराठी रंगभुमी.djvu/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६९
भाग १ ला.


प्रवेशांत जो शृंगार वर्णिला आहे तो भारद्स्त नसून अगदीं अयोग्य आहे. शृंगाररसच नाटकांत आणावयाचा हेोता तर त्याचा संबंध या पात्रांशीं न आणतां दुस-या एखाद्या पात्रांशीं आणला असता तर चांगलें दिसलें असतें. तुकारामाच्या बायकोचें व पोराचें काम या नाटकांत चांगलें वठतें. पण एकंदरींत मार्मिक प्रेक्षकांच्या मनावर या नाटकाचा परिणाम व्हावा तसा होत नाहीं एवढी गोष्ट खरी आहे.
 ' रामदास ' नाटकाच्या प्रयोगासंबंधानेंही आमचें मत असेंच आहे. या नाटकाची रचना अशी झाली आहे की, आरंभीं हिंदुस्थानी भाषेचा प्रवेश घातल्यामुळे व ती भाषाही सर्वांना कळेल अशी नसल्यामुळे प्रयोगांत सपाट्याबरोबर जो रंग भरावयास पाहिजे तो भरत नाहीं. तसेंच साध्या संवादापासून प्रौढ विचारांच्या आत्मगत भाषणापर्यंत येथून तेथून सर्व पात्रांच्या तेंडीं उपमाअलंकार विशेष घातल्यामुळे व संविधानकापेक्षां भाषेकडेच जास्त लक्ष दिल्यामुळे तिकडूनही रसहानी होते. या नाटकांत रा. गणपतराव हे रामदासाची भूमिका घेत असून व्यांच्या हातून तें काम बरें होतें. पण शिवाजीचें काम रा. बळवंतराव हे करीत असून तें तुकाराम नाटकार्तील कामाइतकेंच किंबहुना थोडें जास्तच वाईट होतें. अलीकडे इतर कियेक गोष्ठीत जसा या कंपनीचा हलगर्जीपणा दिसून येतो तसाच नकला पाठ न