पान:मराठी रंगभुमी.djvu/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७०
मराठी रंगभूमि.

करितां प्रयोग रंगभूमीवर घाईने आणण्यांत दिसून येतो. व ही स्थिति उत्तरोत्तर अशीच वाढत गेल्यास कंपनीने आजपर्यंत मिळविलेला लौकिक नाहींसा होईल हे ध्यानात ठेवावें.

ऐतिहासिक नाटके.

 गेल्या आठ दहा वर्षांत ऐतिहासिक नाटकें करण्याकडेही आमच्या लोकांची विशेष प्रवृत्ति झाली आहे; आणि याचे कारणही उघड आहे. ते हे की, पाश्चात्य तेवढे चांगलें, आमचे तेवढे वाईट; आह्मी लोक कसले निवळ जनावरं; आमच्यांत काय कलाकौशल्य आहे धर्म आहे, का सुधारणा आहे वगैरे इंग्रजी शिक्षणाच्या प्रारंभी जे वेडगळ विचार आमच्यांत शिरले होते ते कै. विष्णुशास्त्री चिपळूणकरासारख्या देशाभिमानी गृहस्थाच्या मार्मिक लेखानें विलयास जाऊन आमचा धर्म, आमचा पूर्वेतिहास वगैरे गोष्टींकडे लक्ष लागून पूर्वीच्या थोरथोर पुरुषांबद्दल आमच्यांत अभिमान उत्पन्न होऊन आह्मी त्यांचे धन्यवाद गाऊं लागलों व याचाच प्रभाव नाटकरूपानेही दृष्टीस पडू लागला. पुढे आमच्या देशाच्या इतिहासाची-विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहा- साची-साधनें जसजशी उपलब्ध होऊ लागली तसतशी त्यांच्या आधारे अनेक वीररसात्मक नाटके मराठी भाषेत निर्माण होऊ लागली व ती रंगभूमीवर झळकू लागली. देशाभिमानास अधिक उत्तेजन येऊन ऐतिहासिक नाट-