पान:मराठी रंगभुमी.djvu/84

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८
मराठी रंगभूमि.

प्रकारचा आवाज पाहिजे तो आवाज त्यांचेठायीं नाहीं. तसेंच यांना अभंग चांगले ह्मणतां येत नाहींत हा एक मोठा दोष आहे. तुकारामबुवा रात्रंदिवस भजन आणि कीर्तन करीत असत, व लोकांना उपदेश करीत तो अभंगाच्याच रूपानें करीत. अभंगांतील विचार जोरदार भाषेत घालून भाषणे बनविली आहेत व ती वीररसप्रधान भाषणांप्रमाणे तुकारामबुवा रंगभूमीवर ह्मणत आहेत हे विसंगतच दिसते. शिवाय तुकारामबुवांचे भाषणही अलीकडच्या धर्तीवर शुद्ध भाषेत घातले आहे. पण त्याने रसाचा भंग होतो असें आह्मांस वाटते. जुन्या पद्धतीच्या भजनी दिंडीतील निरूपण करणाऱ्या एखाद्या साध्याभोळ्या इसमाप्रमाणे त्यांची भाषा पाहिजे, व या भाषेनेंच भाक्तिरसास रंग चढून लोकांच्या मनावर चांगला परिणाम करितां येईल. तुकारामबुवांना होऊन फार वर्षे झाली नाहीत. त्यांचा वारकरी पंथ अद्याप अस्तित्वांत असून त्यांतील चांगल्या चांगल्या लोकांचे अद्यापही बालबोध रीती निरूपण ऐकावयास मिळते. तेव्हां तशीच भाषा व अभंग ह्मणण्याची धाटणी तुकारामाच्या पात्राने उचलावयास पाहिजे. या नाटकांत रा. बळवंतराव हे शिवाजीचे काम करितात. पण त्यांचा आवाज मर्दानी कामापेक्षां जनानी कामास जास्त घटल्याने तें काम त्यांच्या हातून नीटपणे वठत नाही. या नाटकांत शिवाजी आणि त्याची बायको या उभयतांचा एका