Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/81

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६५
भाग १ ला.


अभिनय करवून दाखविल्यानें त्याच्यासंबंधाचा पूज्यभाव एका प्रकारानें कमी होती. दुसरें असें कीं, या साधुसंतांच्या चारीत्रांत शांतिरसाचें विशेष प्राबल्य असून तो रस नाटकास वर्ज असल्यामुळे अशा नाटकांची छाप लेोकांवर पडणें अशक्य आहे. तसेंच असल्या सत्पुरुषांचीं वचनें व कृती यांत उदात्तरस भरला असल्यामुळे सामान्यप्रेक्षकांस त्याचा आस्वाद घेतां येणें दुर्घट आहे. ' तुकाराम ’ व ‘रामदास'हीं नाटकें पाहण्यास लोकांचा जो समुदाय लोटतो त्यांत भाविक दृष्टीचे फार असतात, व ते अमुक एक पात्र तुकाराम किंवा रामदास आहे एवढे कळतांच इतर गोष्टींचा विचार न करितां त्याच्या प्रत्येक शब्दुास व प्रत्येक हालचालीस पूज्यभावानें माना डोलवितात; एवढेच नव्हे तर, कित्येक लोकांनीं तुकारामाचें पात्र आरंभीं रंगभूमीवर येतांक्षणींच हात जोडून नमस्कार केल्याचें आमचे पाहण्यांत आहे ! असो; हा निवळ भाविक समाजाचा प्रकार झाला; व नाटयशास्त्राच्या नियमाविरुद्ध कितीही प्रकार या नाटकांत घातले असले तरी हा समाज त्याबद्दल बेफिकीर असून तो असल्या नाटकांची तारीफ करीत राहणार हें उघड आहे. आतां वाईट नाटकें रंगभूमीवर आणून अशा लोकांची करमणूक करण्यापेक्षां असलीं भक्तिरसाचीं नाटकें आणून करमणूक करणें चांगलें हैं आह्मांस मान्य आहे, व तशा दृष्टीनें या नाटकांची