पान:मराठी रंगभुमी.djvu/82

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६६
मराठी रंगभूमि.

आह्मी तारीफही करतो. पण निवळ आंधळ्या भक्तीचा काल आतां राहिला नसल्यामुळे खन्या सत्पुरुषाबद्दल जी खरी पूज्यबुद्धि उत्पन्न व्हावयास पाहिजे ती असल्या नाटकांनी न होतां कित्येक प्रसंगी या साधसंतांची थट्टा झालेली दृष्टीस पडते. यावरून सुशिक्षित लोकांच्या ठायीं भक्ति नसते असा आमचा ह्मणण्याचा हेतु नाहीं; भक्ति असते, पण त्याबरोबर नव्या त-हेनें सत्यासत्य हुडकून काढण्याकडे त्यांच्या दृष्टीचा कल असतो हे लक्षात ठेविलें पाहिजे. अशा लोकांपुढे इतिहासास धरूनच या साधुसंतांसंबंधाच्या गोष्टी आल्या पाहिजेत; व तशा त्या येतील तरच भक्तिरसाचा ठसा त्यांच्या मनावर चांगल्या रीतीने उमटेल. कै. आण्णासाहेब किर्लोसकर यांनी शांकरदिग्जय नाटक रचण्यांत जी चूक केली तीच वरील नाटकांच्या कर्त्यांनी केली आहे, असें ह्मणण्यास हरकत नाही. म्हणजे सत्पुरुषांच्या चरित्राचे अथपासून इतीपर्यंत वर्णन किंवा त्याच्या बन्याच भागाचे वर्णन नाटकांतून करून त्यांची पात्र वरचेवर रंगभूमीवर आणण्यापेक्षा त्यांच्या चरित्रांतील कित्येक गोष्टींचें आनुषंगिक रीतीने वर्णन केल्यास व त्यांस थोडा वेळच रंगभूमीवर आणल्यास त्यांच्या-


 * 'रामदास । नाटकांत काल व प्रसंग यांची किती विसं- गतता आहे हे मुंबईच्या 'नेटिव ओपिनियन' पत्राच्या ता. २६।७।०३ च्या अंकांत दाखविलें आहे तें वाचकांनी पाहावें,