पान:मराठी रंगभुमी.djvu/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६४
मराठी रंगभूमि.

दृष्टीने पाहिले ह्मणजे हे नाटक चांगले साधलें आहे, असें ह्मणण्यास कांही हरकत नाहीं. या नाटकांत भाषणापेक्षां संविधानकानें हास्यरस अधिक खुलला आहे ही गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे. विनोदांतील स्वारस्य ओळखणारा प्रेक्षकगण भेटल्याशिवाय अशा नाटकाची खरी रीझ पडत नाही, व म्हणून या नाटकाचे पुण्याखेरीज इतर ठिकाणी प्रयोग झालेले दृष्टीस पडले नाहीत.
 रा. शिरवळकरकृत 'श्रीतुकाराम ' व रा. ल. ना. जोशीकृत 'श्री समर्थ रामदास ' अशी दोन नाटके अलीकडे या मंडळीने बसविली आहेत. पैकी ' तुका- रामा'चे पुणे, मुंबई वगैरे ठिकाणी अनेक प्रयोग झाले असून 'रामदासा'चे नुकतेच पुण्यास दोन प्रयोग झाले. या प्रयोगांसंबंधानें व पुस्तकांसंबंधाने बऱ्याच वर्तमानपत्रांतन व लोकांच्या तोंडून स्तुतिस्तोत्र गाइलेलें आम- च्या कानी आले आहे. पण तें स्तुतिस्तोत्र वाजवीपेक्षा फाजिल असल्यामुळे त्याने सामान्य जनाचे डोळे दिपून जाऊन नाटक रचणारांनाही एक प्रकारची भ्रांती उत्पन्न केली आहे, असें आह्मांस वाटते. आमच्यामतें श्री तुकारामासारख्या साधुसंतांची चरित्रे नाट- कांचा विषय करण्यास अयोग्य आहेत. कारण, सत्पुरुषांची पात्रे आरंभापासून अखेरपर्यंत रंगभूमीवर आणून त्यांच्याकडून भाषणांवर भाषणे व