पान:मराठी रंगभुमी.djvu/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६३
भाग १ ला.


 ' प्रणयविवाह ' नांवाचें एक नाटक या मंडळीनें गेल्या सालीं बसावलें होतें. हें नाटक आंग्ल-नाटककार शेरिडन याच्या ' डथूएना ' नामक नाटकाच्या आधारें रा. मोडक यांनीं मराठींत लिहिलें असून त्यांत विनोद व हास्य हे दोन रस चांगले साधले आहेत. इंग्रजी नाटकाच्या आधारें मराठींत नाटक लिहितांना तिकडील वस्तुस्थिति व इकडील वस्तुस्थिति, तिकडील आचारविचार व इकडील आचारविचार, तिकडील रीतीरिवाज व इकडील रीतीरिवाज इ. गोष्टींमधील भेद लक्षांत आणून तद्नुसार नाटकरचनेच्या कामीं जी सूक्ष्मदृष्टी करावी लागते तशी जरी या नाटकांत ग्रंथकर्त्यानें केलेली नाहीं व त्यामुळे नाटक जरी बोधप्रद झालें नाहीं, तरी एकंदरीत सामान्यजनाच्या चित्ताचें त्यापासून बरेंच मनोरंजन होतें. हास्यरसात्मक नाटकें मराठींत फार थोडीं आहेत.* याचें कारण ते रस सारखा शेवटपर्यात ठेवण्याचें काम कठिण आहे. अशा


 * विनोद व हास्यू या दृष्टीनें पाहिलं ह्मणजे ' त्राटिका ' व ' प्रणयविवाह " या दोन नाटकाखेराज ' सटवाजीराव ढमाले ' व ' कृपणधनाजीराव ' ही दोन नाटकेंच कायतीं मराठींत दिसतात, हीं दोन्ही नाटकें प्रख्यात फ्रेंच कवि ' मोलियर ' याच्या नाट्कांच्या आधारें मराठीत लिहिलीं आहेत. मोलियर हा किती विनोदू आणि गमत्या होता हें त्याचीं नाटकें ज्यांनीं इंग्रजीत वाचलं असतील त्यांना ठाऊक आहेच. अशा कवीच्या नाटकांधारें रचलेलीं वरील दोन नाटकें मराठी रंगभूमीवर कोणी आणल्यास त्यापासून बराच फायदा होईल असें आह्मांस वाटतें.