पान:मराठी रंगभुमी.djvu/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५५
भाग १ ला.


" मर्चट ऑफ् व्हेनिस ” या नाटकामध्यें रा. गर्दे या नांवाच्या गृहस्थांनीं शायलॉकचें काम केलें होतें. या कामांत त्यांनीं मारवाडी काव्याची व कसाबी निर्दयतेची अशी कांहीं नकल केली हेाती कों, त्यांचें तें काम पाहून सर्व लोक अगदीं खुष झाल हेाते. याच गृहस्थांनीं ' गुणोत्कर्ष ' नाटकांत गणपतराव किल्लेदाराचें काम केलें होतें किल्लेदाराचें काम साधारण पणें यागोच्या कामासारखेच कपटाचें व नीचपणाचें आहे. तें कपट व ते नीचपणा यांनीं आपल्या अभिनयानें फारच सुरेख वठविला होता. शायलॉक व गणपतराव किल्लेदार या व्यक्तींचीं कामें इतकीं हुबेहुब वटून त्यांचा लोकांच्या मनावर जबर परिणाम होण्यास रा. गर्द यांचा चेहराही पुष्कळ अंशीं कारणीभूत झाला. त्यांचा चेहरा वरील पात्रांस साजेल असाच होता, व शिक्षणानेंही त्यांनीं थोडाबहुत कमविला होता. या नाटकांत जिवाजीपंताचें काम बरेंच अवघड आहे, पण तें रा. बापट नांवाच्या हायस्कुलांतील एका शिक्षकानें फारच बहारीचें केलें. रा. गर्द यांच्याप्रमाणेंच रा. बापट यांचा चेहरा व विशेषत: आवाज हा इमानी व राजनिष्ठ ह्याता-या नोकरास जसा असावयास पाहिजे तसा असल्यामुळे त्यानें त्यांच्या कामास विशेष रंग चढला होता. रा. पाटणे व रा.चुणेकर यांनीं अनुक्रमें राधाबाई व शिवाजी महाराज यांचीं कामें केलीं होतीं, व तींही फार सुरेख