Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/72

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५६
मराठी रंगभूमि.

वठली होती. असो; यानंतर संगतीविपाक वगैरे पुढे आणखी काही नाटकें या कॉलेजमध्ये झाली व ती सर्व चांगलीच झाली. अलीकडे नाटकांमुळे कॉलेजांतील विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासावरून उडून दुसरीकडे जातें ह्मणून ह्मणा, किंवा परीक्षेत ती लवकर पास होत नाहीत ह्मणून ह्मणा, अथवा कॉलेजची भट्टी बिघडली आहे ह्मणून ह्मणा, कोणत्या तरी सबबीवर वर्षास नाटक करण्याचे काम रहित झाले आहे. पण यामुळे नवीन नाटकास उत्तेजन मिळून महाराष्ट्रभाषाभि वृद्धीस जें साहाय होत होतें तें नाहींसें झालें याबद्दल फार वाईट वाटते.

नरहरबुवांचें दुर्गा नाटक.

 राजाराम कॉलेजमध्ये नाटके चालली असतां तेथील नरहरबुवा सवाशे यांच्या नाटकमंडळीने 'दुर्गा' नाटक बसविलें. ही मंडळी अजूनपर्यंत मधून मधून पौराणिक नाटकें करीतच होती. दुर्गा नाटक बसविल्यावर या मंडळीची चांगलीच चहा झाली. या मंडळींत रा. विनायकराव कवठेकर हे दुर्गेचें काम करीत असून ते इतकें अप्रतिम होत असे की, तसें आजपर्यंत कोणत्याही नाटकमंडळीत झाले नाही. रा. विनायकराव यांनी स्त्रीवेष घेतला ह्मणजे ते एखाद्या पोक्त बायकोप्रमाणे दिसत असून त्यांची बोलण्याचालण्याची व हावभाव करण्याची एकंदर ढब अगदी खऱ्याखुऱ्या गरती बायको