पान:मराठी रंगभुमी.djvu/63

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४७
भाग १ ला.


तें रा. देवल यांनीं फारच नामी केलें. पण या नाटकाची मुख्य मदार कायती यागोच्या कामावर. यागो ही कष्ट आणि नीचपणा यांची प्रत्यक्ष मूर्ति असून ती हुबेहुब लेोकांपुढे आणून उभी करण्याचें काम फारच अवघड आहे. तथापि, रा. शंकरराव पाटकर यांनीं हें काम इतकें अप्रतिम केलें कीं, आजपर्यत मराठी रंगभूमीवर यांच्या तोडीचें काम करणारा इसम एकही निघाला नाहीं! रा. शंकरराव यांच्या अभिनयनैपुण्याबद्दल एक दोन गोटी येथें सांगितल्या असतां अप्रासंगिक होणार नाहीं. एकदां यांच्या मंडळीमध्यें असा प्रश्न निघाला होता कीं, शंकरराव यांचा चेहरा जात्याच यागोच्या कामास ठीक आहे ह्यणून त्यांच्या हातून तें काम इतके चांगले वटनें; बाकी दुसरें काम इतकें चागल वठणार नाही. ही गोष्ट शंकरराव यांस कळल्यावर ' पाहिजे तें काम मी इतक्या चांगल्या रीतीनें करीन ' असें छातीला हात लावून त्यांनीं मंडळीस सांगितलें, व यासंबंधानें पुढें मंडळींनीं त्यांची परीक्षाही घेतली. या परीक्षेत ते असे कांहीं उतरले की, पुढे त्यांच्या विरुद्ध कोणाची ब्र काढण्याची छाती झाली नाहीं. दुस-या एके वेळीं त्यांनों हमालाचें काम करतों ह्मणून दहा पांच पावलें एक पेोतें नेऊन दाखविलें. तेवढ्या अवधींत प्रेक्षकां कडून त्यांनीं चारवेळ टाळ्या घेतल्या. याप्रमाणें जें जें काम है करीत तें तें असेंच बेमालूम करीत. यांच्या कामाला