पान:मराठी रंगभुमी.djvu/62

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४६
मराठी रंगभूमि.

अभिनय कसा करावा, वीरकरुणादि रसांचा लोकांच्या मनावर कसा पगडा पाडावा इ. गोष्टी त्यांना अवगत असल्यामुळे आपापल्या भूमिकेची छाप त्यांनी लोकांवर चांगलीच पाडली. या मंडळीचे पुरस्कर्ते कै. रा. नामजोशी, कोंडोपंत छत्रे, धारप वगैरे मंडळी असून यांच्या नाटकांत 'मृच्छकटिक, दुर्गा' इत्यादि नाटकांचे कर्ते रा. देवल व अभिनयनैपुण्याबद्दल पुण्यास ज्यांची बरीच ख्याती आहे ते रा. शंकरराव पाटकर वगैरे इसम भूमिका घेणारे होते. या मंडळीनें चार नाटके बसविली होती. एक 'वेणीसंहार,' दुसरें अथेल्लो,' तिसरें 'तारा,' व चवथें नाट्यकथार्णव मासिक पुस्तकांतून प्रसिद्ध झालेलें किंगलियर. ' या नाटकांच्या तालमी खासगीवाले यांच्या वाड्यांत होत. वेणीसंहार नाटक प्रथम केले. त्यांत रा. देवल यांनी अश्वत्थाम्याचे काम केलें; व रा. वामनराव भावे यांनी दुर्योधनाचे काम केले. ही दोन्ही कामें फार चांगली झाली होती. यानंतर या मंडळीचा दुसरा प्रयोग अथेल्लो नाटकाचा झाला. शेक्सपियरचीं अत्यंत नावाजलेलीं ह्मणून जी काही नाटके आहेत त्यात है एक असून रा. महादेव शास्त्री यांनी त्याचे मराठीत भाषांतरही फारच जोरदार शब्दांनी केले आहे. या नाटकांत रा. देवल यांनी अथेल्लो, काम केलें, व रा. शंकरराव पाटकर यांनी यागोचें काम केलें. अथेल्लोचें काम वीरश्रीयुक्त असून