पान:मराठी रंगभुमी.djvu/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४८
मराठी रंगभूमि.

जो विशेष रंग चढत असे त्याचें कारण त्यांच्या जोडी- दार पात्रांचा अभिनय हे होय. बखले ह्मणून एक इसम होते ते यांच्या मंडळींत स्त्रीवेष घेत असत; व रा. केशव- राव आठवले, सदाशिवराव बापट, गोविंदराव शाहाणे, बळवंतराव भोवळकर, सरदेसाई वगैरे इसम इतर भूमिका घेणारे होते. या मंडळीचे जनरल म्यानेजर रा. बळवंत- राव पारखे हे असून त्यांच्या अविश्रांत श्रमानेच या मंडळीची सर्व व्यवस्था बिनबोभाट होत असे. वरील चार नाटकांत 'अथेल्लो हे या मंडळीचे हातखंडे नाटक होते. याचा पहिला प्रयोग जेव्हां आनंदोद्भव थिएटर- मध्ये झाला तेव्हां ज्यांना ज्यांना तो पाहण्यास जाण्याची सवड मिळाली नाही त्यांना त्यांना मोठे वाईट वाटलें; व रा. केरो लक्ष्मण छत्रे, शिवराम हरी साठे, बाबा गोखले वगैरेंच्या मध्यस्थीने 'फिरून हा खेळ करून दाखवावा' ह्मणून मंडळीस वर्तमानपत्रांतून विनंति केली. तसेंच या खेळाची तारीफ ऐकन मुंबईच्या लोकांनीही यांस पाचारण केलें, व तेथेही आपले प्रयोग करून या मंडळीने नांव मिळविले. असो; तर या मंडळींचा पहिला उद्देश जो 'नाट्यकलेत सुधारणा करून लोकांस नवी अभिरुची लावावयाची'तो पुष्कळ अंशानें सफल झाला; एवढेच नव्हे तर, बुकिश नाटके करणाऱ्या कंप- न्यांस 'आर्योद्धारक मंडळी' ही मार्गदर्शक होऊन, त्यांत पुढे ज्या सुधारणा झाल्या त्याचे सर्व श्रेय या मंडळी-