पान:मराठी रंगभुमी.djvu/61

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४५
भाग १ ला.


स्थितीमुळेंच नाटकाच्या धंद्यास अगदीं कमीपणा आला होता हें वर सांगितलेंच आहे. नाटक प्रयोगासारखें मनोरंजनाचें व लोकशिक्षणाचें साधन आशिक्षित लोकांच्या हातीं जाऊन नाट्यकलेची दुर्दशा होत आहे असें पाहून त्या कलेंत सुधारणा झाली पाहिजे असें त्यावेळीं पुण्यांतील शिकलेल्या कित्येक विद्वान् लोकांस वाटू लागलें, व बुकिश नाटकें करणा-या कंपनीस ते आपल्या हातून होईल तितकें साहाय करूं लागले.

आयोंध्दारक मंडळी.

 यावेळीं बुक्रिश नाटकांकडे लोकांची विशेष प्रवृति करण्यास जर कोणती मंडळी कारणीभूत झाली असेल तर ती पुण्यास निघालेली ' आयेंद्धिारक ' मंडळी होय. ही मंडळी पुण्यांतील नव्या विद्वानांच्या उत्तेजनानें निघालेली असून तिचे मुख्य दोन हेतु होते. “ (१) देशांतील नाट्यकला सुधारून लेोकांस नवी अभिरुची वाक्याची, व (२) पैसे मिळवून सार्वजनिक कामास मदत करावयाची.” या दोन हेतूंपैकीं दुसरा हेतु अंशतः साध्य झाला; पण पहिला हेतु बराच सिद्धीस गेला असें पुढील विवेचनावरून केोणासही कळून येईल. ही मंडळी इतर सूामान्य नाटकूमेंडळीप्रमाणें धंदा करणारी नसून धंदेवाईक मंडळीमध्यें जसे कित्येक भाडोत्री नष्ट असतात. तसेही यांत नव्हते. शिकलेसवरलेले लोक आपल्या होसेनें आपण होऊन यांत शिरले असल्यामुळे व