Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४४
मराठी रंगभूमि.

काचें मराठीत केलेलें गद्यपद्यात्मक नाटक रंगभूमीवर करून दाखविलें. याच सुमारास 'थोरले माधवराव' व 'जयपाळ' ही नाटके झाली व त्यांचेही प्रयोग होऊ लागले. थोड्याच दिवसांत माधवरावाचे धाकटे बंधु नारायणराव हेही रंगभूमीवर आले. यानंतर रा. महाजनी यांची 'तारा' बाहेर पडली व इंचलकरंजीकर मंडळीनें फार चांगल्या रीतीने तिला रंगभूमीवर आणले. तारेच्या पाठीमागून हीच मंडळी 'भ्रांतिकृतचमत्कार' करूं लागली. या प्रयोगांत हास्यरस असून तो कांहीं पात्रांच्या सारख्या स्वरूपावर विशेष अवलंबून असल्यामुळे तशी पात्र मिळण्याची मुष्किल पडते. पण इचलकरंजीकर कंपनीत सारख्या चेहऱ्यांच्या दोन जोड्या असल्यामुळे या नाटकांतील धनीचाकरांचा घोटाळा फारच बहारीचा उडत असे.*[] यानंतर रा. गोपाळ अनंत भट यांनी रचलेल्या 'रमा' व 'तारा' नाटकांचे प्रयोग पुणेकर नाटकमंडळीने केले; व पुढे 'शशिकला आणि रत्नपाल' हेही नाटक रंगभूमीवर आले.
 असो; त्यावेळी इचलकरंजीकर, सांगलीकर वगैरे दोन तीन नाटककंपन्यांतच थोडाबहुत जीव होता. बाकी सगळ्या कंपन्यांची फार हलाकीची स्थिति झाली होती; व या


  1. या नाटकांत रा. गोखले व रामभाऊ भिडे हे 'धर्म्या'ची सोंगे करीत; व रा. वासुदेवराव पेंडसे व भास्करराव गाडगीळ हे 'हेमकांता' ची सोंगे करीत.