वरील विवेचनाचा मराठी रंगभूमीशीं काय संबंध आहे असा प्रश्न साहजिक येणार आहे ह्मणून त्याचें उत्तर देणें जरूर आहे. वर ज्या गोष्टी निर्दिष्ट केल्या आहेत त्याचा मराठी रंगभूमीशीं प्रत्यक्ष संबंध नाहीं ही गोट खरी आहे, तथापि अप्रत्यक्ष रीतीनें त्याशों बराच संबंध पोंहींचतो ही गोष्ट थोडया विचारांतीं मार्मिक वाचकांस सहज कळून येईल. हा संबंध असा कीं, संस्कृत व इंग्रजी नाटकांत ज्यांनीं ज्यांनीं सोंगें घेतलीं होतीं ते बहुतेक शिकलेले लोक असल्यामुळे नाटकप्रयोगांत कोणकोणत्या अडचणी येतात, पात्रांची योजना कशी करावी लागते, अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर कसा उठवावा इ० गोष्टींची त्यावेळीं त्यांना चांगली माहिती झाली होती; व त्यांपैकीं ज्यांनीं ज्यांनीं पुढें संस्कृत व इंग्रजी नाटकांचीं भाषांतरें किंवा रूपांतरें केलीं अथवा स्वतंत्र नाटकें मराठींत रचून तीं नाटकमंडळीस शिकविलीं त्यांना तो पूर्वीचा अनुभव चांगला उपयोगी पडला, व त्याचा मराठी रंगभूमीवर बराच परिणाम होऊन त्यांत सुधारणा झाली.
येथूनच बुकिंश नाटकांच्या प्रयोगास सुरवात झाली, अस ह्मणण्यास हरकत नाहीं. सन १८७९ च्या सुमारास रा. धोंडोपंत सांगलीकर यांची नाटकमंडळी पुण्यास आली असतां त्यांनीं संस्कृत मृच्छकटिक नाट-