पान:मराठी रंगभुमी.djvu/6

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 नाहीं, तद्वत्च लोकसमृहाच्या मनाची स्थिति होय. राष्ट्रास रमणुकी अवश्य पाहिजेत; पण त्या सरस, सभ्य आणि मालविकाग्निमित्रांत ह्मटल्याप्रमाणें 'भिन्नरुचर्जनस्य बहुधाप्येकं समाराधन' अशा प्रकारच्या पाहिजेत. अर्थात् हे गुण करमणुकीच्या ठायीं येण्यास नाटकेच नव्हेत तर नाटकगृहें किंवा त्यांची व्यवस्था ह्याही नाटकांतील रसाच्या पोषक होतील अशा पाहिजेत; व याच हेतूनें रा. कुलकर्णी यांनीं नाटकगृहाबद्दलही कांहीं सूचना अखेरीस दिलेल्या आहेंत. सारांश, अशा प्रकारचा ग्रंथ हा जरी पहिला आहे तरी त्यांत रंगभूमीच्या बहुतेक अंगोपांगांचा विचार केलेला असून प्राचीन व अर्वाचीन नाटककंपन्या, त्यांचीं नाटकें व त्यांतील प्रसिद्ध नट यांचीही त्यांत मार्मिक रीतीनें माहिती दिंलेली आहे. मनोरंजनाचे किरकोळ कसेबसे लेख खरडीत बसण्यापेक्षां अशा प्रकारें ऐतिहासिक व मनोरंजक ग्रंथ लिहून मराठी भाषेची सेवा करणे अधिक श्रेयस्कर होय. ता. १०।११।०३


रा. सुधारककर्ते यांचा अभिप्राय.

 रा.रा.कुलकर्णी यांनीं गेल्या साठ वर्षात जेवढया म्हणून पौराणिक, बुकिश अथवा संगीत नाटकांच्या कंपन्या आजपर्यंत होऊन गेल्या अथवा हल्लीं अस्तित्वांत आहेत, तेवढ्यांचा संक्षिप्त इतिहास देऊन त्यांतील मुख्य पात्रांच्या गुणदोषांचें दिग्दर्शन केलें आहें, आणि त्यांच्या संस्थापकांचीं अल्प चरित्रे जोडली आहेत. अशा प्रकारची रंगभूमीची संकलित केलेली माहिती फारच उपयुक्त आहे यांत संशय नाहीं. परंतु या पुस्तकांतील सर्वांत महत्वाचा भाग ह्मटला तर नाटकरचनेंत आणि त्याच्या प्रयोगांत सुधारणा करण्यासाठीं ग्रंथकर्त्यांनें जागोजाग केलल्या सूचना होत. यांतील बहुतेक सर्व भाग गद्य व संगीत नाटकें लिहिणारांनी व त्यांचा प्रयोग करून दाखविणाऱ्या नटांनी लक्षांत ठेविला तर आपल्या नाटकांस हीं जें भिकार वळण लागत चाललें आहे, आणि त्यापासून तरुण लोकांस बोध होऊन सन्मार्गास लावण्याचें काम एका बाजूला राहून चटोरपणा,